मिशन स्काॅलरशिप सराव शिबिराचा समारोप वाजेगाव बीटचा उपक्रम: तज्ज्ञ शिक्षकांचा गौरव जि.प. अध्यक्षा, शिक्षणाधिकारी यांनी घेतली दखल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, February 13, 2020

मिशन स्काॅलरशिप सराव शिबिराचा समारोप वाजेगाव बीटचा उपक्रम: तज्ज्ञ शिक्षकांचा गौरव जि.प. अध्यक्षा, शिक्षणाधिकारी यांनी घेतली दखल


नांदेड :
तीन ते बारा फेब्रुवारीपर्यंत झालेल्या दहा दिवसीय मिशन स्कॉलरशिप सराव शिबिराचा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे समारोप झाला.
या शिबिराचे प्रवर्तक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी या वेळी म्हणाले,  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करता यावा, त्यांनाही शहरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत बरोबरीने सहभागी होता यावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न होता, त्यास बीटमधील तज्ज्ञ शिक्षकांकडून अतिशय उत्कृष्ट साथ लाभली आणि या शिबिरातून विद्यार्थ्यांना खूप काही देता आल्याचे समाधान मिळाले. या शिबिरात सहभागी विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरून गुणवत्ता यादीत झळकावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
           केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड म्हणाले, या शिबिराची दखल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  मंगाराणी अंबुलगेकर यांनी घेतली असून त्यांनी केलेल्या कौतुकाने सर्वांना हुरूप येऊन प्रेरणा मिळाली आहे.
           तसेच शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे यांनीही सराव शिबिराची नोंद घेऊन अभिनंदन केले. या शिबिरासाठी आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज वडगाव येथे सुरक्षित ने-आण करून त्यांची वाहतूक व्यवस्था करणाऱ्या केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे, पदोन्नत मुख्याध्यापक सटवाजी माचनवार, यशवंत सोनकांबळे, तुकाराम रेनकुंटवार, बेबिसरोजा परभत, हणमंत तिडके, शोभा तोटावाड, लक्ष्मी गायकवाड यांचे आभार मानले. तसेच वडगाव शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम जाधव यांनीही सर्व विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
           शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनीही शिबिराचा आम्हाला मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अतिशय फायदा झाला असून आम्हाला परीक्षेत यश मिळवणे सुलभ झाल्याचे सांगत शिबिर आयोजकांचे ऋण व्यक्त केले.
            याप्रसंगी केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे, सचिन दिग्रसकर, सूर्यकांत जाधव, मुख्याध्यापक तुकाराम जाधव, लता शिवाजी, रत्नमाला काटकर, माधव कल्हाळे, भारत देशमुख, रामराव देशमुख, विश्वनाथ होळगे, तुकाराम रेनकुंटवार आदी उपस्थित होते.

वडगाव : मिशन स्काॅलरशिप मधील सर्व तज्ज्ञ शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे, मुख्याध्यापक तुकाराम जाधव-पाटील
           या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक सारंग स्वामी, सायलू मंकोड, जगजित ठाकूर, रूपेश गाडेवाड, रामेश्वर आळंदे, श्रीराम मोगले, विजय गादेवार, अक्षय ढोके, पौर्णिमा अंकमवार, सूमैया खुटानबुजे, अश्विनी गोडीगवार, उषा एडके आदी शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते  सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग स्वामी यांनी केले.अक्षय ढोके यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News