किनवट :
येथील सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक मनोहर कुंडलीकराव थोरात यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने पीएचडी देण्यात आली.
थोरात यांनी ' नांदेड जिल्ह्यातील मथुरा लभाण विमुक्त भटक्या जमातीच्या सामाजिक जीवनाचे समाजशास्त्रीय अध्ययन ' या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यांना मुख्य मार्गदर्शक डॉ. शामल देशमुख व डॉ रामचंद्र भिसे यांनी मार्गदर्शन सहाय्य केले.
या यशाबद्दल सरस्वती शिक्षण संस्था, किनवटचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्माणीवार, उपाध्यक्ष नरसिंगराव सातूरवार व ऍड. शंकरराव राठोड सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, मुख्याध्यापक मुकुंदराव तिरमनवार, प्राचार्य डॉ. किरण पाईकराव , समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. विवेक चनमनवार आदिंसह सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी, शिक्षक तथा विध्यार्थी, मित्र , नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment