गोकुंद्याच्या ओम रुपसिंग जाधव व सोपान सुदर्शन कऱ्हाळे यांची 45 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, February 1, 2020

गोकुंद्याच्या ओम रुपसिंग जाधव व सोपान सुदर्शन कऱ्हाळे यांची 45 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड





किनवट : 
गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या ओम रुपसिंग जाधव व मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडिअम स्कूलच्या
सोपान सुदर्शन कऱ्हाळ यांची 45 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


         शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड व ग्रामीण तंत्रनिकेतन, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. यात गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या ओम रुपसिंग जाधव व मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडिअम स्कूलच्या सोपान सुदर्शन कऱ्हाळे यांनी अदिवासी क्षेत्रातुन अनुक्रमे माध्यमिक व प्राथमिक गटातून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन साठी निवड झाली आहे. त्यांना विज्ञान शिक्षक अंबादास जुनगरे, सुरेंद्र पाटील व सुदेश अंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके, प्राचार्य राजाराम वाघमारे, प्राचार्य भुवनलाल कावळे, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक शेख हैदर, महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, विज्ञान शिक्षक गंगाराम श्रीमंगल, प्रज्ञा पाटील, प्रमोद मुनेश्वर, सतिश विणकरे, विकास गवळे, श्याम जायभाये यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News