... अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार -आदि बनसोडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, February 2, 2020

... अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार -आदि बनसोडे



मुखेड ( नांदेड ) :
मुखेड शहरातील फुले नगर येथील रहिवासी असलेले विजय किशन बनसोडे यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले, परंतु रेतीअभावी काम रखडले आहे. या बांधकामाकरिता विना स्वामित्व पाच ब्रास रेती मिळावी ;अन्यथा जिल्हा मुख्यालयी आमरण उपोषण करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
        शासनाकडून मंजूर घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पाच ब्रास रेती विना स्वामित्व शुल्क देणे बाबतचा निर्णय घेतला असून मला त्या निर्णयानुसार रेती देण्यात यावी , मी कुठल्या शासकीय रेती घाटावरुन माझी देय असलेली पाच ब्रास रेती घ्यावी. याचा परवाना मला देण्यात यावे, अशी मागणी आदि बनसोडे यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केले आहे. जर मला घर बांधण्यासाठी पाच ब्रास रेतीचा परवाना  मिळाली नाही तर मी लोकशाही मार्गाने आपल्या नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 7 फेबु्वारी 2020 रोजी पासुन अमरण उपोषण करणार आहे. सदर काळात माझे काही बरेवाईट झाल्यास त्यास आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी, असे घरकुल लाभार्थी असलेले विजय किशन बनसोडे यांचे चिरंजीव आदि बनसोडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News