कल्याण :
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रवचनातून बदनामीकारक अपशब्द उच्चारल्याने कीर्तनकार व प्रवचनकर निवृत्ती महाराज यांच्या विरोधात कल्याणातील खडकपाडा पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कल्याणातील वकील आशिष शुद्धोधन इंगळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
निवृत्ती महाराज यांच्या प्रवचनाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती . एका सार्वजनिक प्रवचनात त्यांनी डॉ . बाबासाहेब आबेडकर आणि भारतीय संविधानासंदर्भात गैरसमज पसरवणारे विधान केले होते . यासंदर्भात कल्याण येथील वकील आशिष इंगळे यांनी निवृत्ती महाराज याच्या विरोधात कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती . त्या तक्रारीच्या आधारे निवृत्ती महाराजांविरोधात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त पोवार अधिक तपास करीत आहेत . याबाबत क्लिप व्हायरल झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठली . या आक्षेपार्ह वक्तव्यांचा ठिकठिकाणी निषेध करण्यात आला आणि याप्रकरणी कारवाईचीही मागणी झाली .




No comments:
Post a Comment