लोकनृत्याच्या शैलियुक्त व प्रगत तांत्रिक रूपातूनच अभिजात नृत्यशैलीची निर्मिती -आमदार भिमराव केराम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, February 18, 2020

लोकनृत्याच्या शैलियुक्त व प्रगत तांत्रिक रूपातूनच अभिजात नृत्यशैलीची निर्मिती -आमदार भिमराव केराम



जिप शाळांचा सांस्कृतिक महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन


किनवट :
लोकमानसातून उसळणाऱ्या चैतन्याचा साकल्यात्मक परिणाम आणि त्याच्या आविष्कारातील उत्स्फूर्तता, उत्कटपणा आणि साधेपणा यांना महत्व असते. तृप्तीचा आनंद प्रकट करणारी नृत्ये म्हणून लोकनृत्याचा लौकिक आहे. याच लोकनृत्याचं जेव्हा शैलियुक्त व प्रगत तांत्रिक रूप प्राप्त होते. तेव्हा त्यातून अभिजात नृत्यशैली निर्माण होते. असे प्रतिपादन आमदार भिमराव केराम यांनी केले. 
     
 जिल्हा परिषद हायस्कूल ( मुलांचे ), किनवट येथील संत तुकाराम महाराज सभागृहात सर्व शिक्षकांच्या वतीने आयोजित नयाकॅम्प, किनवट संकुलांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी सभापती सोपानराव केंद्रे, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, अनिल तिरमनवार, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई राठोड, धरमसिंग राठोड, निवृत्त गट शिक्षणाधिकारी अरूणकुमार वतनीवकील, सरपंच आत्माराम मुंडे, बालाजी पावडे, भास्कर कऱ्हाळे, सिद्धार्थ भवरे, सतीश बिराजदार, संतोष चनमनवार, शिक्षण विस्तार अधिकारी ना.ना. पांचाळ, बालाजी धोत्रे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
     
 याप्रसंगी दिलीप कांबळे यांना राज्यस्तरीय गुणीजन पुरस्कार आ. भिमराव केराम यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. केंद्र प्रमुख रमेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक मोहन जाधव यांनी आभार मानले.

         समूहनृत्यातील यशवंत असे : 'अ 'गट ( इयत्ता १ ली ते ४ थी ) : प्रथम : ... मरमी मंडा हिरवाले... गोडी गीत ( जि.प. प्रा.शा. सिरमेटी ), द्वितीय : ... गोंधळ मांडीला भवानी... गोंधळ गीत ( जि.प. प्रा.शा. मथुरानगर ), तृतिय : ... साले मराझिल्पे... गोडी गीत ( जि.प. प्रा.शा.भिमपूर, ' ब ' गट ( इयत्ता ५ वी ते ७ वी ) : प्रथम :... झुंजू मुंजू पहाट झाली... शेतकरी गीत ( जि.प. प्रा.शा. शिवाजीनगर ), द्वितीय :... ऐ वतन ऐ वतन... देशभक्ती गीत ( शिवाजीनगर ), तृतीय : ... आई भवानी तुझ्या भेटीला... ( जि.प. प्रा.शा. गोकुंदा ), ' क ' गट ( इयत्ता ८ वी ते १० वी ) : प्रथम : ... देश रंगीला रंगीला... देशभक्ती गीत ( जि.प. हा. ( मुलींचे ), किनवट, द्वितीय :... देश रंगीला... देशभक्ती ( जि.प. हा. ( मुलांचे ), किनवट, तृतीय : ... दर्या किनारे एक बंगलो गं पोरी... कोळीगीत ( जि.प. हा. ( मुलींचे ), किनवट

         यावेळी रासेयो विभागीय समन्वयक प्रा.डॉ. पंजाब शेरे, संगीतकार प्राचार्य सुरेश पाटील व नृत्यदिग्दर्शिका अंतरा बाभुळकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, सचिन कोंडापलकुलवार, अशोक नेवळे, जीवन गुरनुले, उल्हास सुदेगुनवार, पोतदार, अमोल उत्तरवार, गिरीश पत्की, सत्यभामा मुंडे, भुजंग मेश्राम, साई नेम्माणीवार, समशेरखान, नवनाथ कोळनुरे, रवि नेम्माणीवार, योगेश वैद्य, निवेदक कानिंदे आदिंनी परिश्रम घेतले.

         

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News