मातंग समता परिषद अध्यक्षपदी के. मूर्ती व सचिवपदी दुर्गादास बटूर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, February 26, 2020

मातंग समता परिषद अध्यक्षपदी के. मूर्ती व सचिवपदी दुर्गादास बटूर



किनवट :
मातंग समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच समाज हिताच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी किनवट व माहूर तालुक्यातील मातंग समाजाची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. 25 ) किनवट येथील जिल्हा परिषद विश्रामगृहात संपन्न झाली असून या बैठकीत सकल मातंग समता परिषदेची स्थापना होऊन अध्यक्षपदी के. मूर्ती तर कार्याध्यक्षपदी दुर्गादास बटुर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
                 किनवट, माहूर तालुक्यात  मोलमजुरी व काबाडकष्ट करून जगणाऱ्या मातंग समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही अद्याप सुटलेले नाहीत. शिक्षण, रोजगार तसेच मूलभूत सोयी सुविधांपासून हा समाज आजही वंचित आहे. शिवाय मातंग समाजाचे अनेक प्रश्न आजही शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे मातंग समाजाचे प्रश्न मार्गी लावून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांच्या पुढाकारातून किनवट माहूर तालुक्यातील मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली होती.
               बैठकीच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे तालुका अध्यक्ष शिवन्ना कलगोटवार होते. बैठकीत मातंग समाजाच्या सामाजिक राजकीय तसेच आर्थिक परिस्थितीवर सांगोपांग चर्चा होऊन समाजाच्या हिताच्या प्रश्नासाठी आंदोलन मोर्चे करण्यासंदर्भात दिशा ठरविण्यात आली. तसेच माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांच्या सूचनेनुसार बैठकीत सकल मातंग समता परिषदेची स्थापना करण्यात येऊन या परिषदेच्या अध्यक्षपदी के. मूर्ती यांची तर कार्याध्यक्षपदी दुर्गादास बटूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सकल मातंग समता परिषद ही ता. 3 मार्च पासून किनवट व माहूर तालुक्यात दौरा करून मातंग समाजाच्या कुटुंबांना भेटणार आहेत. तसेच समाजाच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर त्यांच्या शासकीय सोयी सवलती व सामाजिक प्रश्नांवर मातंग बांधव व युवकांना ही परिषद मार्गदर्शन करून जन जागृती करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
              या बैठकीत नारायण सांगळे, आडेलु बोनगीर, जनार्धन काळे यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले व यापुढे सामाजिक उपक्रम राबवत असताना समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला . स्वामी नूतपेल्लीवार यांनी सूत्रसंचालन केले. नरसिंग कारपेंटर यांनी आभार मानले.  बैठकीत बापूराव माहुरकर, दिगंबर गादेकर, लिंगन्ना कोतूरवार, राज माहुरकर, संजय कोतूरवार, स्वामी मुर्ती यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News