'सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना ...! ' -प्रेम हनवते ; कनकवाडी येथे बपा महाविद्यालय युवक शिबीर उद्घाटन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, February 2, 2020

'सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना ...! ' -प्रेम हनवते ; कनकवाडी येथे बपा महाविद्यालय युवक शिबीर उद्घाटन



किनवट :
"सबसे खतरनाक क्या होता है ? सबसे खतरनाक होता है सब कुछ सह लेना और हमारे सपनों का मर जाना ! युवकांनो तुमची स्वप्ने जीवंत ठेवा , जीवनात कठीण काहीच नाही फक्त तुम्ही प्रयत्नवादी व्हावा समाज आणि देशाने मला काय दिले ? असे म्हणण्यापेक्षा मी माझ्या देशाला काय देऊ शकतो?  याचा विचार करा .तुम्ही दीप नव्हे तर आता दीपस्तंभ बनून दिशा देण्याचे कार्य तुम्ही केले पाहिजे,असे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यिक, अभ्यासू वक्ते प्रेम हनवते उमरखेड यांनी व्यक्त केले .
             बळीराम पाटील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कनकवाडी येथे पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी स्वच्छ भारत अभियान विशेष वार्षिक युवक शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
             उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. के. जी. कारामुंगे होते ; तर प्राचार्य डॉ .एस .के .बेंबरेकर , प्रा . डॉ वसंत राठोड , प्रा .डॉ .आनंद भालेराव , सरपंच  जयश्री पंडीत व्यवहारे, प्रा. अनिल पाटील , प्रा. डॉ .लता पेंडलवाड, प्रा .शिवदास बोकडे , प्रा डॉ .जी. बी. लांब , विलास  माणिकराव  सोळंके आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
             उद्घाटक प्रेम हनवते यांनी सुमारे चाळीस मिनिटांच्या प्रेरणादायी भाषणातून  त्यांनी अवतार सिंग पाश यांच्या कवितेच्या ओळीचा संदर्भ देत युवकांना अंतर्मुख करुन टाकले. यावेळी प्रा .डॉ.वसंत राठोड यांनी युवकांना मार्गदर्शन केले .त्यांनी गाईलेल्या "साथियों सलाम है "या जोशपूर्ण गीताने शिबिरात रंगत भरली. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा .डॉ .पंजाब शेरे यांनी प्रारताविक केले. प्रा .पुरुषोत्तम येरडलावार यांनी प्रास्ताविक केले. प्रा .सुलोचना जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. शुभांगी दिवे, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा. मंदाकिनी राठोड, प्रा. आम्रपाली हटकर, मिलिंद लोकडे, महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक शादाब, मुकुंद वाघमारे, संजय चुनगुवार . सम्राट पाटील, निखिल खराटे, युवक, युवती , शिबिरार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पशू तपासणी, शस्त्रक्रिया व मोफत औषधी वाटप


बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी स्वच्छ भारत अभियान विशेष वार्षिक युवक शिबिर,दत्तकगाव कनकवाडी येथे पशू, तपासणी, शस्त्रक्रिया व मोफत औषधी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
         या शिबिरात एकुण 123 जनावरांची तपासणी करण्यात आली.गाय,म्हैश, शेळी अशा विविध प्रकारच्या जनावरांची तपासणी करुन इंजेक्शन, औषधी ,जंतनाशक औषधी, देण्यात आली. वंधत्व तपासणी, खच्चीकरण तपासणी, याशिबिरात करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. व्हि. बी. बिरादार, डॉ. सर. बी. शेवनकर, एस.एस.घुले, जी.आर.खुपासे, व्हि.पी.पेटकुले, जी.एस.पांडे यांनी उपस्थित राहून पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, परिचर यांनी परिश्रम घेतले. वंधत्व निदान व औषधौपचार शिबिराचे संचलन ग्रामविकास परिवर्तक पांडूरंग मामीडवार यांनी केले.रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी जनावरांची तपासणी करण्याचे आव्हान केले.सरपंच जयश्री पंडीत व्यवहारे ,पंडीत व्यवहारे यांनी उपस्थित कर्मचारी यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी रासेयो स्वयंसेवक, अकुंश जाधव,  आशिष कांबळे, निखिल खराटे , विकास मारेकेवार, सच्चितांनंद हंबीरगे यांनी  सहकार्य केले. डॉ. पंजाब शेरे यांनी आभार मानले.

कनकवाडी येथे युवक शिबीरात आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप


बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी स्वच्छ भारत अभियान विशेष युवक शिबीर दत्तकगाव मौजे कनकवाडी येथे आरोग्य तपासणी व मोफत औषधी, गोळ्याचे वाटप करण्यात आले.
         या आरोग्य शिबिरात रक्त तपासणी  करण्यात आले.या शिबिरात कनकवाडी येथील नागरिकांनी प्रतिसाद दिला. या शिबिरात प्रसंगी गावच्या सरपंच जयश्रीताई व्यवहारे,यांनी गावक-यांनी आरोग्याची तपासणी करून घेण्याचे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यंकट आईटवार, डॉ. भाग्यश्री वाघमारे, आरोग्य सहाय्यक नरसिंग आन्नेनवार, आरोग्य कर्मचारी, ए.जी. पिंपरी, प्रकाश सिरसाट . राम सरपेल्लीवार, मीना जांभळे,जी.एम.दमगीर यानी तपासणी शिबिरात रुग्णाची तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी पंडीत व्यवहारे, विलास सोळूके,पुडलींक पारधी, दत्ताराम जाधव, ग्राम प्रवर्तक पांडूरंग मामीडवार, मिलिंद लोकडे, अंकुश जाधव, संजय चुनगुरवार, सम्राट पाटील, निखिल खराटे यांनी परिश्रम घेतले.   विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.पंजाब शेरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

स्वच्छता शिबीरात श्रमदानातून युवकांनी केले कनकवाडीला चकाचक


बळीराम पाटील कला, वाणिज्य  व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी स्वच्छ भारत अभियान विशेष वार्षिक युवक मौजे दतकगाव कनकवाडी येथे सकाळच्या सत्रातील स्वच्छता शिबीरात श्रमदानातून युवकांनी केले कनकवाडी गावाला केल चकाचक.
         यावेळी परिसर स्वच्छता करण्यात आली.नाली सरळीकरण, घाण, चिखल काढणे, पाणी टाकून  परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. जमा झालेला ओला व वाळलेला कचरा एक खड्डा करुन टाकण्यात आला. या स्वच्छता शिबिराचे उदघाटन पंडित व्यवहारे यांच्याहस्ते करण्यात आले. स्वच्छतेचे महत्त्व व युवकांची भुमिका या विषयावर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पंजाब शेरे  यांनी सविस्तर माहिती दिली. ग्राम प्रवर्तक पांडूरंग मामीडवार ,मिलिंद  लोकडे, सुधीर पाटील, रासेयो स्वयंसेवक संजय चुनगुरवार, सम्राट पाटील, शेख फाजील,  आशिष कांबळे, आकाश बोईनवाड, अंकुश जाधव, आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. अकुंश जाधव यांनी आभार मानले.

     

विषमुक्त शेती व झिरो बजेट शेतीतूनच शेतकरी स्वावलंबी होईल
-प्रा. उमाकांत इंगोले 


नवतंत्रज्ञानाचा वापर करून विषमुक्त शेती व झिरो बजेट शेतीतूनच शेतकरी स्वावलंबी होईल, कुणालाही आत्महत्या करण्याची गरज नाही, तेव्हा या बाबीचा जास्तीत जात प्रचार, प्रसार होणे अत्यावश्यक असल्याचे मत प्रा. उमाकांत इंगोले यांनी केल.
             बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञानमहाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी स्वच्छ भारत अभियान विशेष वार्षिक युवक शिबिरात कनकवाडी येथे बौध्दिक सत्रात विविध विषयांवर मंथन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना सोप्याभाषेत मार्गदर्शन करतांना शेतीतज्ज्ञ प्रा. उमाकांत इंगोले बोलत होते.
             यावेळी ग्रामस्वच्छेतेचे महत्त्व या विषयांवर प्रा.डि.पी.चंदेले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.आपल्या परिसरातील वनौषधी या विषयावर संशोधक, वनस्पतीशास्त्राचे प्रा. डॉ.सुरेंद्र शिंदे, नाटककार, तथा नाट्यलेखक प्रा.डाॅ.अंबादास कांबळे, शेती व शेतक-याच्या विविध योजना याविषयी अनुभवी शेतीतज्ज्ञ प्रा. विजय खूपसे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच जयवंत जाधव हे होते.पोलिस पाटील विलास सोळंके, पंडित व्यवहारे,अशोक जामगे आदिंसह बहुसंख्येने गावकरी, रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.  रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा उत्कृष्ट रासेयो विद्यापीठस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम प्रवर्तक पांडूरंग मामीडवार, सुधीर पाटील, अंकुश जाधव, सम्राट पाटील, शेख फाजील, सच्चिदानंद हंबीरगे, संजय चुनगुरवाड, आशिष कांबळे, आकाश बोईनवाड, निखिल खराटे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News