किनवट :
सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट अंतर्गत येणाऱ्या किनवट व माहूर तहसिल कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महिलांचे वेगवेगळे आजार, रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, डॉ. सिडाम, डॉ.वाघमारे यांनी कोरोना विषयी मार्गदर्शन केले. याच दिवसाचे औचित्य साधून माहूर तालुक्यातील वानोळा येथील ज्येष्ठ महिला नागरिक यांचा एका प्रकरणात निकाल देऊन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी साडी -चोळी देऊन सत्कार केला.
किनवटचे तहसिलदार नरेंद्र देशमुख व माहूर येथील तहसीलदार यांच्या अर्धांगिनी कृतिका वरणगावकर यांनी स्त्री सशक्तीकरण व सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन केले. महिला वकील सिडाम व गिरी यांनी स्त्री विषयक कायदे व तरतुदी सांगितल्या. महिला मंडळ अधिकारी शिवकांत होनवडजकर, तलाठी भाग्यश्री तेलंगे, योगिता राठोड, अव्वल कारकून पद्मा निलगिरवार, लिपीक पिंजरकर, कोतवाल कल्पना खराटे आदि महिला कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment