किनवट तालुक्यात दहावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीतपणे सुरू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 12, 2020

किनवट तालुक्यात दहावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीतपणे सुरू


किनवट  :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत लातूर विभागीय मंडळ लातूरच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इयता दहावी ) तालुक्यातील अकरा केंद्रावर कॉपीमुक्त वातावरणात अत्यंत सुरळीतपणे सुरू असून मागील चार पेपरला अद्याप एकही कॉपी प्रकरण आढळले नाही.
              सोमवारी (ता. नऊ ) इंग्रजी विषयाच्या पेपरला बसलेल्या तीन हजार चारशे एकतीस पैकी तीन हजार तिनशे सात विद्यार्थी उपस्थित होते ; तर एकशे चोवीस जणांनी दांडी मारली.
तालुक्यातील केंद्रनिहाय परिक्षेस बसलेले विद्यार्थी कंसात केंद्र संचालक : सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळा, मांडवा रोड, किनवट - ४०० ( मुकूंद तिरमनवार ), महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा -४०० ( शेख हैदर), सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय, सुभाषनगर, किनवट -३०० ( प्रकाश राठोड ), जवाहेरूल उलूम उर्दू हायस्कूल, किनवट -२७९ ( वाय.एम. शेख ), शासकीय आश्रमशाळा, सारखणी -३३२ ( एच. जी. मठ्ठमवाड ), शासकीय आश्रमशाळा, उमरी (बाजार ) -२५६ ( बी.डी. मेहेत्रे ), सरस विद्यालय, माडवी -१८१ ( घनश्याम राठोड ), अशोक विद्यालय, पळशी -१४० ( विजय दहेकर ), जिल्हा परिषद हायस्कूल, बोधडी ( बुद्रूक ) -३१५ ( बाजीराव बुरकुले ),  शासकीय आश्रमशाळा, जलधारा -४२८ ( संतोष पाटील ), जिल्हा परिषद हायस्कूल, इस्लापूर -४०० ( गजानन पाटील ). 
         सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार नरेंद्र देशमुख व गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे परीक्षा समन्वयक गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी परिक्षेचं उत्तम नियोजन केलं आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भरारी पथक नेमलं असून शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, उत्तम कानिंदे, राम बुसमवार, वसंत खांडरे हे ह्या पथकाचे सहायक आहेत.
        जिल्हा परिषद हायस्कूल ( मुलांचे ), किनवट येथे स्थापित परिक्षक कार्यालयाचे  शिक्षण विस्तार अधिकारी सुदर्शन मेश्राम परिरक्षक तर समशेर खान सहायक परिरक्षक आहेत. सर्व केंद्रप्रमुख यांचे बैठे पथक व महसूल विभागाचे भरारी पथक प्रत्येक केंद्रावर पहारा देत आहे.
        जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) बालासाहेब कुंडगीर व (प्राथमिक ) प्रशांत दिग्रसकर यांनी संपूर्ण परीक्षा केंद्राचे छायाचित्रण करण्याचे नियोजन केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारोती थोरात (किनवट ), सहायक पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे ( मांडवी ), मल्हार शिवरकर ( सिंदखेड )  व सुशांत चिनगे ( इस्लापूर ) यांनी सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे.

" तालुक्यातील बहुतांशी परीक्षा केंद्रांना आम्ही स्वतः भेटी दिल्या, कुठेही कॉपी नाही, वा कोणत्याही परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी नाही. आम्ही प्रकल्पस्तरावर आश्रम शाळा परीक्षा केंद्रावर स्वतंत्र भरारी पथक नेमले आहे. निर्भय, मुक्त वातावरणात सुरळीतपणे परीक्षा पार पडत आहेत.
-अभिनव गोयल (भाप्रसे ), 
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी, किनवट

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News