किनवट :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच फटाक्यांची आतिषबाजी केली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव तिथीनुसार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने किनवट शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शेकडो मनसैनिक जमा झाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी केली. मनसैनिकांचा हा उत्साह पाहून काहीवेळातच आजूबाजूला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी सुद्धा या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर मनसे आणि शिवसेना दोघांनीही एकत्रितपणे छत्रपती शिवरायांचा जयघोष केला.विशेष म्हणजे या जयंतीनिमित्त दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळा परिसरात मुख्य मार्गावर ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेले मनसेचे झेंडे लावल्यामुळे मुख्य बाजारपेठ भगवी झाल्याचे दिसून येत होती.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध भारत देशाचे दैवत आहेत. छत्रपती शिवरायांचा काळ हा भारताचा सर्वात वैभवशाली काळ होता.त्यांच्या काळामध्ये भारताचा जगात नावलौकिक झाला म्हणून छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन सबंध भारत देशाने वाटचाल करणे आवश्यक आहे.आज देशाला शिवराज्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या जयंती सोहळ्यात मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम पवार, शहराध्यक्ष सुनील ईरावार, शहर सचिव चंद्रकांत तम्मडवार, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद भंडारे, विद्यार्थी सेनेचे रोहित भिसे, नागेश मंत्रीवार, अनिल इरावार, कुलदीप मोहरे, मयूर रुणवाल, इलियास चौधरी, विजय माहुरकर, अजय ताकपेल्लीवार, सुरज लढे, चेतन रुणवाल, अविनाश कालसवार, आर्यन मोहरे, सुरज चव्हाण, ऋषिकेश दोनकोंडवार, विशाल शिंदे, दत्तू कर्दपवार, अजय पेंढारकर, गणेश कर्णेवाड, प्रशांत सातपल्लीवार, आदर्श रेड्डी, शंकर घोडाम, अजय, शुभम, निखिल, तथागत तसेच शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बालाजी मुरकुटे, भाजपचे सुधाकर भोयर, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगर सेवक सूरज सातूरवार, मारोती सुंकलवाड, पंडित रासमवार, नितीन कावळे यांच्यासह पत्रकार, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment