नांदेड :
जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यभर फौजदारी प्रक्रिया संहिता 144 कलमान्वये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सदर संचारबंदी व लॉकडाऊनच्या अनुषंगाने लोकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे एक सुसज्ज नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, येथील दूरध्वनी क्रमांक 02462- 234720 व हेल्पलाइन क्रमांक 1091 व 100 क्रमांकाच्या पाच लाईन सुरु करण्यात आल्या आहेत. याचा लाभ सर्व जनतेंनी घ्यावा असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर (भा.पो.से. ) यांनी केले आहे.
तसेच नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना पोलिसांसोबत सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या, तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी. याकरिता नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे व्हाट्सअप मेसेज सेवा सुरू करण्यात आलेली आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध राहणार असून त्याचा क्रमांक 8888889255 हा आहे. या क्रमांकावर देखील नागरिकांना माहिती देता येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी कळविले आहे.

No comments:
Post a Comment