किनवट :
तालुक्यातील लोणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बिट मारेगाव ( वरचे ) चे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खुडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषाणूविषयी जनजागृती केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुणे, शिंकताना खोकताना रुमालाचा वापर करणे, टिशू पेपरचा वापर करणे, आजारी असताना शाळेत येण्याचे टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, वारंवार तोंड डोळे नाक यांना हात न लावणे, ताप सर्दी खोकला असणाऱ्या व्यक्तीपासून एक मीटर दूर राहणे, गरज असल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात जाणे अशा प्रकारच्या सूचना वजा मार्गदर्शन खुडे यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थी खूप आजारी असेल तर शाळेतही येऊ नये असेही त्यांनी सांगितले.
इत्यादी बाबी सदरचा आजार तसेच अन्य बहुसंख्य संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. या बाबी माहिती असणे सर्वांना आवश्यक आहे. शाळेतल्या मुलांनी स्वतःची काळजी तर घ्यावे पण घरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये याविषयी जागरुकता निर्माण करावी. असेही ते म्हणाले. यावेळी मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, शाहीन बेग व विद्या श्रीमेवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन रमेश मुनेश्वर यानी आभार मानले. शिक्षकांसह इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment