नासा येवतीकर यांच्या काव्यांगण उपक्रमास पाचवे पारितोषिक - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 31, 2020

नासा येवतीकर यांच्या काव्यांगण उपक्रमास पाचवे पारितोषिक


धर्माबाद :
काव्यांगण - रोज एक कविता या नाविन्यपूर्ण उपक्रमास राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सहभागी उपक्रमातून पाचव्या क्रमांकाचे स्थान मिळाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे व्दारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०१९-२० अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम २०१९-२० स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात धर्माबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील स्तंभलेखक, कवी व उपक्रमशील शिक्षक नासा येवतीकर यांच्या "काव्यांगण - रोज एक कविता " या उपक्रमास पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
            या उपक्रमाअंतर्गत राज्यातील जवळपास सत्तर कवी व कवयित्री यांच्या कविता रोज फलकांवर लिहिण्यात येत होत्या. यासाठी त्यांना माधव हिमगिरे यांची मोलाची साथ मिळाली. यातून प्रेरणा घेऊन शाळेतील काही विद्यार्थी स्वतः कविता तयार करत आहेत, हा या उपक्रमाचा फायदा आहे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित शिक्षणाची वारीमध्ये मेंदूची व्यायामशाळा स्टॉलमधून सक्रिय सहभाग नोंदविला होता. 
            यायशाबद्दल धर्माबादचे गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पी. आर. कमटलवार, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे, केंद्रीय मुख्याध्यापक एम. एस. वारले, केंद्रप्रमुख ए. डी. ऐनवाले, प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक एम. एन. कागेरू, सहकारी शिक्षक माधव हिमगिरे, एजाज सय्यद, श्रीमती एम. डी. जोशी, श्रीमती सी. एच. सय्यद, श्रीमती एस. डी. बेहरे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पत्रकार भगवान कांबळे, उदयकुमार शिलारे, रमेश इटलोड, साईनाथ सायबलू, किरण रणवीरकर, क्रांती बुद्धेवार, नंदकुमार राजमल्ले, एम. डी. भोसले, वीरभद्र बसापुरे, कुणाल पवारे, संतोष पेंडकर, शंकर उषापोड, शेख इलियास, राजू भद्रे, गोविंद येळगे, प्रमिलाताई सेनकुडे, व्यंकटेश काटकर, आप्पासाहेब सुरवसे, शिवराज गागीलगे, शंकर हसगुळे, रमेश मुनेश्वर, साईनाथ कामीनवार, शेषराव माडेवार, रामरेड्डी अरकलवार, सगर पंढरी, आनंद यडपलवार, विकास जाकापुरे, सुधाकर चिलकेवार, शिवाजी सूर्यवंशी, विष्णू गंभीरे, माधव सोनटक्के, एल. वाय. मुपडे, संजय कदम, श्याम मुलकोड, मरकंटे, अशोक पवळे, कैलास शिंदे, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News