किनवट :
एककीडे स्थानिक विकास कामाचा निधी राहत कोषात जमा करण्याची खासदारांत चढाओढ लागली असतांना आपला विकास निधी कोणत्याही फंडात न जमा करता; तो प्रत्यक्ष खरी गरज असलेल्या वेळी रुग्णालयाच्या यंत्र खरेदीसाठी उपलब्ध करून देणारे भीमराव केराम हे एकमेव बहाद्दर आमदार ठरले आहेत.
कोरोना विषाणू (कोव्हीड -19 ) च्या पार्श्वभुमीवर रूग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामग्री व साहीत्य खरेदीसाठी चाळीस लक्ष रुपयाचा आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना आमदार भीमराव केराम यांनी दिले आहे.
वर्तमान स्थितीत भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'कोरोना' विषाणू चा उद्रेक पाहता या विषाणूच्या प्रकोपात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे दिसत असून यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी व विषाणूची वाढ थांबविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी बहूल किनवट व माहूर तालुक्यातील जनतेला यासंबंधातील संसर्ग परिस्थितीत येथील रूग्णालयात पुरेसा वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा (किनवट ) व ग्रामीण रुग्णालय, माहूर या दोन्ही ठिकाणी यंत्रसामग्री व साहीत्य खरेदीसाठी प्रत्येकी वीस लक्ष या प्रमाणे एकूण चाळीस लक्ष रूपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा असे आमदार भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
देशपातळीवर आपण पाहिलं तर असं दिसून येते की, खासदार निधी हा केंद्र सरकार देतो. हेच खासदार तोच सरकारचा निधी त्याच सरकारच्या प्रधानमंत्री फंडात जमा करीत आहेत. मग हेच प्रधानमंत्री हाच निधी त्याच खासदारांना त्यांच्या क्षेत्रात कोरोना विषयक उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देतील.
परंतु येथील आमदारांनी त्यांचा स्थानिक विकास निधी थेट रूग्णालयांच्या यंत्र सामुग्री व इतर साहित्य खरेदीसाठी तात्काळ दिल्याच्या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



No comments:
Post a Comment