नांदेड :
प्रत्येकाने बुद्धांची शिकवण अंगिकारुन धम्माचे आचरण केल्यास जीवन सुखी होईल असे प्रतिपादन पुज्य भदंत जीवक यांनी केले.
भोकर तालुक्यातील मौजे नागापूर येथे शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी आठवी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भन्ते आनंद किर्ती, भन्ते सारीपुत्त, भन्ते विश्वबोधी, भन्ते गौतमरत्न यांच्यासह भिक्खु संघाची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, बुध्दाचा धम्म हा विज्ञानवादी असुन येथे अंधश्रद्धेला स्थान नाही. आर्य आष्ठांगीक मार्ग व पंचशिलाचे आचारणासह विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा पाळल्यास जीवनाचा मार्ग सुखकर होईल असेही ते म्हणाले. यावेळी मिलिंद व्यवहारे यांनी तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर त्रिशरण व पंचशील गाथेचे पठन करण्यात आले.
याप्रसंगी मंचावरील भिक्खुसंघानी धम्मदेशना दिली. भगवान बुध्दांच्या विवेक, करुणा व शांती या उपदेशांचा प्रसार करण्यासाठी बौध्द धम्म परिषदेचे दरवर्षी नागापूर येथे अयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजक दत्ता व्यवहारे यांनी प्रास्ताविकात दिली. यावेळी धम्म परिषदेसाठी पुढाकार घेणा-या महिला आघाडीच्या सदस्यांचा सुरेखा किशनराव कसबे गोळेगावकर यांच्याहस्ते शॉल व पुष्प देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी.एस. सरोदे यांनी केले. त्यानंतर गंगाधर व्यवहारे यांच्या वतीने दुपारी भोजनदान देण्यात आले.
सकाळी धम्म ध्वजारोहन झाल्यानंतर शांती संदेश यात्रा काढण्यात आली. धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला सरपंच बालाजीराव शानोमवाड, माजी पोलीस पाटील गंगाधरराव शानोमवाड, विद्यमान पोलीस पाटील शानोमवाड, चेअरमन रुख्माजी बेरदेवाड, माजी सरपंच बालाजीराव अल्लेवाड, उपसरपंच राजू पाटील शानोमवाड, सखाराम धात्रक व वामनराव पर्वत, किशनराव कसबे गोळेगावकर, रवी लोहाळे, डॉ. नदंलाल लोकडे, संदीप कांबळे, आयोजक दत्ता व्यवहारे, संयोजक उत्तम डुम्मेराव, संजय कसबे, स्वागतेच्छुक मनोज रिंगनमोडे, गंगाधर कसबे, प्रकाश सर्पे, साधना रावळे, मायावती रिंगणमोडे, अनुसयाबाई व्यवहारे, शांताबाई जोंधळे, गोदावरी व्यवहारे, विमल जोंधळे, नारायण कसबे, राहुल जोंधळे, महिला आघाडी, युवा आघाडी, प्रतिष्ठित नागरीक, परिसरातील महिला, पुरुष व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती हेाती.





No comments:
Post a Comment