नांदेड :
गर्दी न जमू देता रुग्णांना कोरोना विषाणू संदर्भात प्रबोधन करण्यात यावे. या अटीच्या अधिन राहून महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आता जिल्ह्यातील खाजगी दवाखाण्यातील बाह्यरुग्णसेवा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग
प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या अन्वये
जिल्हयातील बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवण्याबाबतचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई
यांच्या दिनांक २३ मार्चच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने पूर्वीच्या आदेशात
अंशतः बदल करुन नांदेड जिल्हयातील
वैद्यकीय सोयीच्या दृष्टीकोनातुन सर्व खाजगी दवाखाण्यातील बाह्य रुग्ण सेवा पुढील अटींचे अधीन राहून सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हा दंडाधिकारी यांनी सुधारित आदेशात म्हटले आहे.
ओ.पी.डी. मध्ये रुग्णांची गर्दी होणार नाही, याकार्यालयाने वेळोवेळी दिलेले निर्देशाचे कटाक्षाने अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. रुग्णांना एकमेकास संसर्ग संक्रमित होणार नाही याची विशेष काळजी घेवून तशा प्रकारची काळजी घेण्यात यावी.कोरोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यकता भासल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ६५ चा वापर करुन खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व त्यांचे अधिनस्त कर्मचारी इमारत परिसर व तत्सम संसाधने अधिग्रहीत करण्यात येईल. कोरोना विषाणूचा ( कोव्हीड-१९ ) प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना कोरोना विषाणू संदर्भात प्रबोधन करण्यात यावे. असेही आदेशात नमूद केले आहे.




No comments:
Post a Comment