नांदेड :
कोरोना विषाणू ( कोव्हीड-१९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुर्वी दिलेल्या आदेशात सुधारणा करून गर्दी जमू नये याकरिता आता
२४ मार्च पहाटे शून्य वाजतापासून ते ३१ मार्च मध्यरात्री चोवीस वाजेपर्यंत नागरी , ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात सुध्दा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जमावबंदी ( १४४ ) आदेश लागु केला आहेच ;परंतु या बरोबरच आंतरराज्यसीमा बंद करण्यात येत असून खासगी तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी यापूर्वीच्या आदेशान्वये दिनांक . २२ मार्च २०२० रोजी सकाळी ०५ . ०० वा . पासून ते दि . ३१ . ०३ . २०२० चे २४ . ०० वा . पर्यंत नागरी भागात ( महानगर पालीका , नगर परीषद व नगर पंचायत ) राहण्याऱ्या नागरी भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते . तथापि अधिसुचनेव्दारे वेगळयाने निर्देश प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासन यांचेकडील अधिसुचना क्र . करोना २०२० / प्रक्र . ५८ / आरोग्य ५ दि . १४ मार्च , २०२० मध्ये मिळालेल्या निर्देशान्वये उक्त प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपायोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केले आहे . त्यानुसार व फौजदारी प्रक्रीया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ खालील तरतूदीच्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील नागरी , ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनतेस , खालील व्यक्ती , आस्थापना यांना उद्देशुन सुधारीत आदेश काढणे आवश्यक असल्याचे माझी खात्री झाली आहे . त्यामुळेच फौजदारी प्रक्रीया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर (भा.प्र.से. ) यांनी जिल्हयात दिनांक २४ मार्च , २०२० रोजी रात्री ०० . ०० वा . पासुन ते दिनांक ३१ मार्च , २०२० रोजी मध्यरात्री २४ . ०० वा . पर्यंत नागरी , ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात खालील प्रमाणे जमावबंदी आदेश लागु केला आहे .
सदर आदेश लागु झाल्यापासून उपरोक्त कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे प्रतिबंध राहील . १ ) याव्दारे जिल्हयातील सर्व आंतर राज्य सिमा बंद करण्यात येत आहे . केवळ अत्यावश्यक सेवा आणि नाशवंत वस्तुची वाहतुकीस परवानगी राहील . २ ) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या तसेच सर्व खाजगी बसेस बंद राहतील .३ ) एका पेक्षा जास्त प्रवाशी नसलेला ऍटोरिक्क्षा तसेच टॅक्सी मध्ये चालक वगळून इतर दोन प्रवाशी आदेशात नमुद अटी व शर्तीच्या अधिन राहून आपात्कालीन वैद्यकीय सेवेसाठी परवानगी असेल . ४ ) आपात्कालीन वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा साठी खाजगी वाहनांना केवळ वाहन चालका व्यतिरीक्त एका व्यक्तीस अनुमती राहील . ५ ) सर्व आंतरराज्य वाहतुक करणारी शासकीय व खाजगी बस सेवा बंद करण्यात येत आहे .६ ) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गृह अलगीकरण ( Home Quarantine ) म्हणून त्या व्यक्त ओळखीची खुण म्हणून गृह अलगीकरणाचा शिक्का उमटविलेला आहे अशी व्यक्ती दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांचे घरात राहणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची शासकीय अलगीकरण ( Quarantine ) केंद्रात रवानगी करण्यात येईल . ७ ) जनतेंनी घरातच राहणे बंधनकारक राहील केवळ जीवनावश्यक वस्तुची खरेदी / वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडण्याची मुभा राहील . ८ ) कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र थांबता येणार नाही . ९ ) सर्व प्रकारचे व्यवसायीक आस्थापने , कार्यालये , कारखाने, कार्यशाळा , गोदाम इत्यादीसह सर्व दुकाने बंद राहतील. तथापि सतत प्रक्रीया करणारे औषधालये , शेतीमाल प्रक्रीया करणारे युनीट यांना दाळ व तादुळ गिरणी खाद्याशी संबंधित उद्योग दुग्ध शाळा , खाद्य व चारा युनिट इत्यादी अत्यावश्यक वस्तु उत्पादनात काम करणारे घटक चालू राहतील . १० ) शासकीय कार्यालय , दुकाने व आस्थापना या कालावधीत कमीत कमी कर्मचारी संख्येवर चालू राहतील . परंतु या ठीकाणी एकमेकामधील अंतर कमीत कमी ३ फुट ठेवणे व सामाजिक अंतर ठेवणे योग्य ती स्वच्छता सुनिश्चित करणे आणि हात धुण्यासाठी सॅनिटायझर व हात धुण्याची सुविधा असणे आवश्यक आहे यांची संबंधित आस्थापना प्रमुखांनी खात्री करावी. ११ ) जिल्हयातील कोणत्याही नागरीकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेर जिल्हयात जाण्यास मनाई करण्यात येत आहे . १२ ) पुणे - मुंबई व ईतर महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करीत आहे .
पुढील नमुद अत्यावश्यक वस्तु , सेवा पुरविणारी दुकाने आस्थापना यांना वरील प्रतिबंधातुन वगळण्यात येत आहे .

१ ) बँक / एटीएम , विमा वित्तीय सेवा आणि संबंधित कामे . २ ) सर्व प्रकारचे दैनिक प्रसार माध्यमांचे ( सर्व प्रकारचे दैनिक , नियतकालीके , टिव्ही न्युज चॅनल इ . ) ३ ) माहिती व तंत्रज्ञान , टेलीकॉम , पोस्टल , इंटरनेट डेटा सर्विस संबंधित आस्थापना , ४ ) पुरवठा साखळी मधील अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहतुक . ५ ) शेती माल व उत्पादनाची , वस्तुंची निर्यात व आयात करणारी आस्थापना ,६ ) औषधी आणि वैद्यकीय उपकरणे इत्यादी पुरविणारी संस्था ७ ) खाद्य पदार्थ विक्री , किराणा सामान , धान्य , ब्रेड , फळे , भाज्या अंडी , मांस , मासे विक्री .आणि त्यांची वाहतूक व साठवणूकीची गोदामे. ८ ) बेकरी व पाळीव प्राण्यांची पशुवैद्यकीय आस्थापने / दुकाने ९ ) घरपोच सेवा देणारे उपहारगृह . १० ) दवाखाने , औषधालये , ऑप्टीकल स्टोअर्स , औषध निर्मिती केंद्रे आणि त्याच्याशी संबंधित व्यापारी आस्थापना व वाहतुक . ११ ) पेट्रोलपंप , एलपीजी गॅस , ऑईल
एजंसीज व त्याच्याशी संबंधित गोदामे व वाहतुक, १२ ) सर्व सुरक्षा आणि सुविधा व अत्यावश्यक सेवा पुरविणारे खाजगी प्रतिष्ठाने . १३ ) कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या खाजगी संस्था . १४ ) वरील प्रमाणे पुरवठा करणारी संबंधित यंत्रणा . १५ ) सर्व अंमलबजावणी करणारी यंत्रणांनी हे लक्षात घ्यावे की मुलतः सदर प्रतिबंध हे लोकांच्या हालचालीशी संबंधित असून वस्तु आणि वस्तुशी संबंधित नाहीत . १६ ) राज्य शासनाचे विभाग / कार्यालये , निमशासकीय संस्था केवळ अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठीच चालू राहतील . १७ ) जिल्हयाच्या बाहेरुन जिल्हयामध्ये येणारी सर्व वाहतुक , तातडीची वैद्यकीय सेवा वगळता बंद राहील .
सदरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी / कर्मचारी व अत्यावश्यक सेवा यांच्यासाठी लागू राहणार नाहीत . तथापि त्यांना सोबत ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील . सदरील आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल . सदरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सहेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही . तसेच , यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / सुधारीत आदेश / निर्देश / परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील . हे आदेश दि . २३ . ०३ . २०२० रोजी माझे सही शिक्यानिशी निर्गमित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment