बुद्धगया ( बिहार ) .
जागतिक वारसा स्थळ असलेल्या येथील महाबोधी महाविहार बोधगया टेम्पल व्यवस्थापन समितीच्या वतीने कोरोना (कोव्हीड -19 ) प्रादुर्भाव प्रतिबंधक उपाययोजनेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना (कोव्हीड- 19 ) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या वतीने करीत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जागतिक वारसा स्थळ असलेल्या येथील महाबोधी महाविहार बोधगया टेम्पल व्यवस्थापन समितीच्या वतीने शुक्रवारी ( ता. 27 ) आरटीजीएसद्वारे बिहार मुख्यमंत्री सहायता निधीत एक कोटी रुपये जमा केले असल्याचे गयाचे जिल्हाधिकारी तथा महाविहार व्यवस्थापन समितीचे सह अध्यक्ष अभिषेक सिंह,भाप्रसे, यांनी कळविले आहे. जगातील सर्व बौध्दाचं प्रेरणास्थान असलेल्या महाबोधी महाविहाराने माणुसकीसाठी आम्ही सदैवं तत्पर असल्याचे दाखवून दिले आहे.




No comments:
Post a Comment