एकतीस मार्चपर्यंत बँकातुन पीक विमा , कर्ज व सर्व अनुदान वाटप बंद करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 23, 2020

एकतीस मार्चपर्यंत बँकातुन पीक विमा , कर्ज व सर्व अनुदान वाटप बंद करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश



नांदेड :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व बँकातुन होणारे पीक विमा , कर्ज वाटप व शासनाकडून देण्यात येणारे सर्व अनुदानाचे वाटप दि . ३१ . ०३ . २०२० पर्यंत बंद करण्याचे आदेश  जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर (भा.प्र.से. ) यांनी सोमवारी ( दि. २३ ) दिले आहेत. 
         नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व बँकातुन होणारे पीक विमा , कर्ज वाटप व शासनाकडून देण्यात येणारे सर्व अनुदानाचे वाटप दि . ३१ . ०३ . २०२० पर्यंत बंद करण्याचे आदेश  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , नांदेडचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से. ) यांनी दिले आहेत.
         परंतु बँकाचे इतर व्यवहार या पूर्वी दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन नियमितपणे चालु राहतील . सदर आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समुह हे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमूद केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News