किनवट :
कोरोना प्रादुर्भावाने किनवट व माहूर तालुक्यातील कोलाम आदिम या जमातीतील लोक सध्यस्थितीत लॉकडाऊनमुळे शंभर टक्के आपल्या झोपडीतच राहात असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेले साहित्य त्यांच्या घरपोच वाटप करावे अशा सूचना आमदार भीमराव केराम यांनी प्रकल्प अधिकारी किनवट यांना केल्या आहेत.
आ. केराम यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथील प्रकल्प अधिकारी यांना दि. ३० मार्च रोजी एक पत्राद्वारे कळविले आहे की, किनवट माहूर विधानसभा क्षेत्रात एकूण २२ पोड (खेडे) हे गावापासून दूर व संपर्काबाहेर असून तेथे आदिम जमाती कोलाम हे वास्तव्यास आहेत. तथापी ही जमात लाजरी, बोजरी, भमिहीन व मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणारी आहे. आजच्या लॉकडाउन परिस्थितीत १०० टक्के लोक हे ताटी लावून आपल्या झोपडीतच त्यांनी स्वतःळा कोंडून घेतले आहे. आजमितीस त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांना आवश्यक असलेले गहू, तांदूळ, तेल, मीठ, मिरची इत्यादी आवश्यक साहित्य तात्काळ घरपोच वाटप करण्यात यावे अशा लेखी सूचना आ. भिमरावजी केराम यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांना केल्या असून याबरोबरच आपल्या अधिनस्त असलेल्या वैद्यकीय सेवेतील रूग्णवाहीकेद्वारे सदर कोलाम वस्तीत दक्षता म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.




No comments:
Post a Comment