कोलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धेत किनवटच्या शिवाजी गेडाम या आदिवासी सुपुत्राने सुवर्ण पदक पटकावले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, March 6, 2020

कोलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धेत किनवटच्या शिवाजी गेडाम या आदिवासी सुपुत्राने सुवर्ण पदक पटकावले



किनवट ( संतोष मऱ्हसकोल्हे ) :
Great things never come from comfort zones...
या उक्तीप्रमाणे शिवाजी नागोराव गेडाम ह्या किनवट आदिवासी बहुल तालुक्यातील आदिवासी सुपूत्राने जेम-तेम १५ ते २० घरांंची वस्ती असलेल्या गोंडखेडा (कोपरा) या गावातील गरीब शेतमजूर आई वडीलांच्या पोटी जन्मलेल्या  शिवाजीच्या घरात कसलाच  शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वारसा नसताना हे यश संपादन केले. खेर्डा गावातील आदिवासी आश्रम शाळेतुन शैक्षणिक प्रवास सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने त्याच्या अंगी असलेल्या क्रीडा नैपुण्याचा /कौशल्याचा उदय होत गेला. प्रारंभी रनिंग सारख्या क्षेत्रात प्राविण्य गाजवलेल्या शिवाजीने गडचिरोली येथील क्रीडा प्रबोधनित प्रवेशीत झाला. त्यानंतर आकोला येथील क्रीडा प्रबोधनित प्रवेश घेऊन आंतरराष्ट्रीय आॕलिम्पिक स्पर्धेत उतरण्याचे स्वप्न उराशी बाळगून बाॅक्सर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रवेश घेतला. त्याकाळात त्याने तालुका जिल्हा व विभाग स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धेत यश संपादन केले होते. त्यामुळे त्याला महाराष्ट्र बाँक्सींग संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी कोलकता येथिल राष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धेत संधी मिळाली आणि त्याने त्या   संधीचे सोने करायचे आणि महाराष्ट्राची शान वाढवण्याचे ठरवले. त्याने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यांत त्याने सुवर्ण  पदक जिंकून महाराष्ट्राची शान तसेच किनवट तालुक्याची शान राखली.त्याबद्दल त्याचे किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल (भाप्रसे), गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी कौतुक केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  या यशाबद्दल  त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News