महिलांनी उमटविला कर्तृत्वाचा ठसा -सुरेश पाटील - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 7, 2020

महिलांनी उमटविला कर्तृत्वाचा ठसा -सुरेश पाटील


महिलांनी उमटविला कर्तृत्वाचा ठसा


-सुरेश पाटील


( 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सुरेश पाटील यांचा लेख -संपादक )

            विश्वाला स्त्री ही  निसर्गाने दिलेली महान शक्ती आहे . संयमी , शांत , चिकित्सक , धाडसी प्रसंगी रागीट वागून अबला नसून ती सबला आहे . भारतामध्ये स्त्रीने फक्त कुटूंबापुरते चुल आणि मुल या कार्यक्षेत्रात राहावे असा समज होता . परंतू सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , क्रीडा , उद्योग , विज्ञान , कला , अध्यात्म या सर्व क्षेत्रात महिलांनी सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहावा असे कार्य केले आहे . पुरातन काळामध्ये गार्गी , मैत्रेयी , लोपामुद्रा , सुलभा ह्या विदुषी विद्वान महिला होवून गेल्या . मध्ययुगीन काळात संत जनाबाई , संत मुक्ताबाई , संत बहिणाबाई , संत कान्होपात्रा ह्यांनी अभंगाने लोक जागृती केली . ऐतिहासिक काळात स्वराज्यसंकल्पक राजमाता जिजाऊ माँ साहेब भोसले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराजांना घडविले . आपले पती क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा देवून स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतीकारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सनातनी लोकांचे दगड , शेण झेलत शिक्षणाची ज्योत घराघरात लावली . या कामी शिक्षिका फातिमा बी शेख यांनी सुद्धा शिक्षणाचे महान कार्य केले . पतीच्या निधनानंतर अहिल्याबाई होळकर यांनी 29 वर्षे राज्ये सांभाळले . त्यागमुर्ती माता रमाई यांनी हिमालयाची सावली बनून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली . आदिवासी विरांगना झलकारी बाई मडावी यांनी शत्रुला सळो की पळो करून सोडले . सामकी याडी यांनी परीवर्तन वादी महान कार्य केले . कोणत्याही समाजाची , देशाची प्रगती पहावयाची असेल तर त्या समाजातील महिला किती शिकल्या यावरून कळते असे डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात . जगात व भारतात सर्वोच्च पदावर स्थान मिळविण्यासाठी महिलांना अनेक संकटांना , आव्हानांना तोंड द्यावे लागलेले आहे . तेव्हा कुठे इतिहासाने त्यांची यशस्वितेची दखल घेतलेली दिसते . जगातील पहील्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके ( श्रीलंका ) , मार्गारेट थेंचर ( इंग्लंड ) , जेनी शिपले ( न्युझीलंड ) , गोल्डा मायर ( इस्राइल ) , आंग सान सू की ( ब्रम्हदेश ) च्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या झुंझारनेत्या , हिलरी क्लिटन अमेरीकन नेत्या , बेनजीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान , बेगम खलीदा झिया बांग्लादेश पंतप्रधान तर भारतात प्रतिभा पाटील राष्ट्रपती , इंदीरा गांधी पंतप्रधान यांनी सर्वोच्च पदावर आपल्या कार्यशैलीने स्वतंत्र ठसा उमटवला आहे .


आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उच्च कोटीची भरारी घेतली आहे . स्वातंत्र्यसमरात मादाम भिकाजी कामा , आरुणाअसफ अली , कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन स्वातंत्र्यसंग्रामातील हेरगीरी करणाऱ्या अजीजान , सामाजिक क्षेत्रात पंडीता रमाबाई , हेलन केलर , मदर तेरेसा , किरण बेदी , वैज्ञानिक क्षेत्रात अंतराळवीर कल्पना चावला , सुनिता विल्यम्स , साहीत्य कलेमध्ये महाश्वेतादेवी ( ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त बंगाली लेखिका ) , अमृता शेरगील ( प्रसिद्ध चित्रकार ) , गानसम्राज्ञी लता मंगेशकर , क्रीडा विभागात पी . टी . उषा ( धावपटु ) , बच्छेद्री पाल ( एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी प्रथम महिला ) , सानिया मिर्झ ( टेनिस ) , सायना नेहवाल ( बॅडमिंटन ) , विनिता फोगट ( कुस्ती ) , हरमनप्रित कौर ( क्रिकेट ) , वैद्यकिय क्षेत्रात डॉ . रखमाबाई , डॉ . आनंदीबाई जोशी , डॉ . कमला सोहनी ( पहिल्या भारतीय महिला शास्रज्ञ ) , मेरी क्यूरी ( नोबेल पुरस्कार प्राप्त ) , इतर क्षेत्रांमध्ये शहनाझ हुसेन ( प्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञ ) , नीला सत्यनारायण ( पहिल्या निवडणूक आयूक्त ) , पद्दा बंडोपाध्याय ( पहिल्या एअरमार्शल ) , इंद्रा नूयी ( प्रसिद्ध उद्योजिका ) , शोभना भारती ( संपादकीय निर्देशक ) , पुनीत अरोरा ( महिला सेना अधिकारी ) , देवयानी खोब्रागडे ( अमेरिकन राजदुत ) , इला भट ( समाजसेविका ) तर ग्रामीण भागातून कार्तीकी गायकवाड ( सारेगम विजेती ) , स्वराजी जाधव ( राजगायीका ) , ईश्वरी उपलेंचवार ( सुवर्णपदक विजेती खेळाडू ) , शैफाली वर्मा ( क्रिकेट खेळाडू ) यांनी स्वकर्तुत्वाने आपला ठसा उमटवून इतिहासात महिलांचे नाव अजरामर केले आहे . जेथे स्त्रीची पुजा केली जाते तेथे स्वर्ग निर्माण होतो . भगवान बुद्धांनी स्त्रियांना सर्वप्रथम भिक्षूसंघात प्रवेश देवून स्वातंत्र्य दिले . माँ के पैरो के निचे जन्नत होती है . प्रेषित मोहम्मद पैगंबराची शिकवण आहे . गुरु नानक साहेबांनी ही स्रीला पुज्यनिय मानले आहे . सध्याच्या युगात महिला , मुलींनी स्वरक्षणासाठी कराटे शिकून स्वावलंबी व्हावे व नवीन भारत निर्माण करावा .

-सुरेश पाटील
शिक्षक
किनवट ता . किनवट
मो . नं . 9921100580

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News