किनवट :
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात असल्याने मतदार संघातील दुर्गम भागाकडे दुर्लक्ष होवू नये यासाठी आमदार महोदयांनी स्वीय सहायकांना तातडीने दुर्गम भागाचा दौरा करून जनतेच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना केल्याने ग्रामीण भागातील जनता आमदारांच्या कर्तव्याप्रती समाधान व्यक्त करीत आहे. यावरून...घार उडे आकाशी... लक्ष तिचे पिलापाशी... या म्हणीची प्रचिती होत आहे.
किनवट - माहूरचे आमदार भीमराव केराम हे मागील काही दिवस मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी झाले होते. अशा वेळी मतदार संघातील अतिदुर्गम भागात जाऊन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यावरून स्वीय सहायक प्रकाश कुडमते यांच्यासह ऍड. दिनेश एेवुतकर, युवराज राठोड, निलुभाऊ, देवराव कुड़मते, संदेश केराम,भडंगे आदिंनी माहुर तालुक्यातील ग्रामीण व अतिदुर्गम भागातील रुई, हडसनी, अनमाळ, तांदळा, शिवूर, महादापुर, इवळेश्वर, कुपटी, बोरवाड़ी, भीमपूर आदी गावांचा दौरा करून सार्वजनिक निकडीच्या समस्या जाणून घेतल्या. यामुळे सर्वसामान्यांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर "आमदार है दमदार" अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment