आपण स्वतः लिंगभेद न करता महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी -न्यायाधीश जहांगीर पठाण ; जागतिक महिला दिन निमित्त निर्भया वॉक फेरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 10, 2020

आपण स्वतः लिंगभेद न करता महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी -न्यायाधीश जहांगीर पठाण ; जागतिक महिला दिन निमित्त निर्भया वॉक फेरी


किनवट :
समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपण स्वतः स्त्री -पुरुष असा लिंगभेद न करता महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी. संविधानाने आपणास दिलेल्या हक्क अधिकाराची जाणीव ठेवावी. असे प्रतिपादन सह दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले.
            जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेनुसार पोलिस स्टेशन किनवटच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्तआयोजित "निर्भया वॉक फेरीचा " प्रारंभ करतांना ते बोलत होते.
            यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, अभियंता प्रशांत ठमके, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, केंद्र प्रमुख रमेश राठोड, रामा ऊईके, शिवाजी खुडे, विजय मडावी, प्रकाश होळकर, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा.डॉ. पंजाब शेरे, नंदिनी पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्या सुरेखा काळे, गंगुबाई परेकार, प्रीती मुनेश्वर, भावना दीक्षित, परविनबेगम, रजिया शेख, आशा कदम आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून छत्रपती शिवराय पुतळा चौकातून फेरीस प्रारंभ झाला. त्यानंतर बस स्टँड रोड मार्गे ही फेरी राष्ट्रपिता जोतीराव फुले -सावित्रीमाई फुले पुतळा चौक, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुतळा चौक, राष्ट्रनिर्माते डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पंचायत समिती किनवट मार्गे -शहीद बिरसामुंडा पुतळा चौक येथे आली.अशोक स्तंभाजवळ या फेरीचा समारोप झाल्यानंतर गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आयोजित महिला कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात फेरीतील सर्वजन सहभागी झाले. उत्तम कानिदे यांनी सूत्रसंचालन केले.
            या फेरीत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनी , पाटील स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या विद्यार्थिनी, शिक्षिका, महिला पोलिस आदिंची बहुसंख्येनं उपस्थिती होती . अंकुश मुळे यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News