किनवट :
महिला ह्या घर, दार इतरांसाठीच सतत झटत असतात. महिलांनी स्वतःकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे. स्वतःचं संरक्षण स्वतःच करण्यासाठी त्यांना सक्षम व्हायचं आहे. यासाठी त्यांनी नियमित योगा करणे, व्यायाम करणे आणि कराटेचे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पोलीस स्टेशन किनवटच्या वतीने आयोजित केलेल्या "महिला कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचा " अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्या उज्वला राठोड, दक्षता समितीच्या सदस्या परविनबेगम शेख, नंदिनी पाटील, श्रीमती अरूणादेवी मोरे, सफाई कामगार सविता सुद्देवाड व बेबाबाई धोत्रे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
याप्रसंगी कृष्णल सतीश पाटील व सुद्देवाड या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त भाषण केले. पुढे बोलतांना प्राचार्या ठमके म्हणाल्या, केवळ चूल आणि मूल यामध्ये गुरफटनं महिलांनी आता सोडून द्यायला पाहिजे. आपण जे कोणतं काम निवडलं त्यात स्वतःला झोकून देऊन निडरपणे ते करावं आणि त्यात प्राविण्य मिळवावं. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भावना दीक्षित यांनी आभार मानले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, उपनगराध्यक्ष अजय चाडावार,पोलिस निरीक्षक मारोती थोरात, अभियंता प्रशांत ठमके, नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा.डॉ. पंजाब शेरे, केंद्र प्रमुख रमेश राठोड, रामा उईके, शिवाजी खुडे, विजय मडावी, प्रकाश होळकर, बाळकृष्ण कदम, साजीद बडगुजर, प्रमोद पोहरकर, शिवाजी काळे आदि मान्यवरांनी प्रेक्षकांत बसून मंचावर अतिथी म्हणून महिलांना स्थान देऊन त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमास महिला दक्षता समिती सदस्या सुरेखा काळे, प्रीती मुनेश्वर, गंगुबाई परेकार, आशा कदम, रजिया शेख, कविता गोणारकर, डॉ. क्रांती मोरे, सुप्रिया मोरे, इंदुताई कानिंदे आदिंसह युवती -विद्यार्थिनी बहुसंख्येनं उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला पोलिस अनिता गजलवाड, अनिता कावळे,रायचलवाड, गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे जी.जी. नैताम, एस. एन. ब्राह्मण, दत्तात्रय मुंडे, बाळू कवडे आदिंनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment