किनवट :
महिलांच्या जन्मापासून नव्हे तर गर्भात असताना पासूनच संविधानाने कायद्याचे कवच पुरविले आहे. त्या सर्व कायद्याची माहिती घेऊन महिलांनी सक्षम व्हावे व आपापल्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करावे असे प्रतिपादन ऍड. के.के. साबळे यांनी केले.
सिध्दार्थनगर येथील समता प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्त प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका अनुसया मधुकर अन्नेलवार , माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्माणीवार यांनी पोलिस प्रशासनाच्या सहयोगाने 'सन्मान नारी शक्तीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. वंदना पत्की कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समिती सभापती पुजा बालाजी धोत्रे , नगरसेविका जिजाबाई मेश्राम, अनिता क्यातमवार, रजनी श्रीमनवार व सुहासिनी श्रिनिवास नेम्माणीवार यांची उपस्थिती होती . उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. गृहलक्ष्मी महिला ग्रामविकास संस्थेच्या संगीता पाटील -सोनकांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुढे ऍड. साबळे म्हणाले, आपल्यासाठी असलेल्या सर्व कायद्यांची माहिती आपण करून घ्यावी.आलेल्या सर्व संकटाचा धैर्याने मुकाबला करावा. जुन्या खुळचट रूढी, परंपरा यांना मूठमाती देऊन अंधश्रध्दा न बाळगता वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा. सासू -सुनेमधील दरी कमी करण्यासाठी त्यांनी अनेक गमती -जमती सांगून सर्वांना मनमुराद हसविले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या पुढील महिलांचा ' सन्मान नारी शक्तीचा ' या कार्यक्रमात गोरव करण्यात आला : वंदना संतोष तिमनवार, उपाध्यक्षा, जनकल्याण नागरी सह. पतसंस्था ( सहकार क्षेत्र ), डॉ. वंदना पत्की ( वैद्यकीय ), संगीता पाटील -सोनकांबळे ( महिला बचत गट ), फरहीन जाफर , संगीता पडवळे ( शिक्षिका ), प्रेमिला हटकर ( अंगणवाडी कार्यकर्ती ), अनिता गज्जजलवार, अनिता कावळे ( पोलिस ), पुनम दीक्षित ( समाजसेवा ), लक्ष्मीबाई गायकवाड, अनिता कत्तलवार, सोनी सुद्दलवार, पुजा सुद्दलवार, किष्टाबाई मंत्रीवार, प्रेमिला कार्लावार, पोसानी कामगोटूवार, गंगूबाई कार्लावार ( सर्व सफाई कामगार ).
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते दादाराव कयापाक, आमदार प्रतिनिधी संतोष मऱ्हसकोल्हे, पोलीस निरीक्षक मारोती थोरात , पायल जयस्वाल आदि मान्यवर उपस्थित होते .
अध्यक्षीय समारोप करतांना डॉ .वंदना पत्की यांनी माहिला दिन व कोरोना व्हायरस बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखील कावळे, शुभम भवरे, रवी दिसलवार, गौरव इटकेपेल्लीवार, मुख्याध्यापक संजय राठोड यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment