गावनिहाय वाटपापेक्षा शेतकऱ्यांचे अनुदान थेट खात्यावर जमा करा -आमदार भीमराव केराम 'मध्यवर्ती बँकेच्या अजब कारभाराबाबत तहसीलदारांना सुचना...' - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, April 16, 2020

गावनिहाय वाटपापेक्षा शेतकऱ्यांचे अनुदान थेट खात्यावर जमा करा -आमदार भीमराव केराम 'मध्यवर्ती बँकेच्या अजब कारभाराबाबत तहसीलदारांना सुचना...'



किनवट : 
लॉकडाऊन व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अनुदान मध्यवर्ती बँक गावनिहाय वाटप करीत असल्याने सोशल डिस्टेंसींगचे तिन तेरा वाजवण्यापेक्षा ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याच्या सूचना आमदार भीमराव केराम यांनी किनवट व माहूरच्या तहसीलदारांना दिल्या आहेत.
            किनवट व माहूर तालुक्यातील अतिवृष्टी व महामहीम राज्यपाल घोषित अनुदानाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जमा झाली असून सदरची रक्कम शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा करणे क्रम:प्राप्त आहे. परंतु किनवट व माहूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखेतून सदरची अनुदानाची रक्कम गावनिहाय वाटप सुरू आहे. यामुळे गर्दी जमत आहे. लॉकडाऊन व संचारबंदीची परिस्थिती पाहता 'कोरोना' विषाणूची श्रृखंला तोडणे अत्यावश्यक बाब बनल्याने सामाजिक अंतर राखणेही तितकेच गरजेचे आहे.  त्यामुळे असे न करता सदरची अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्याच्या सूचना आमदार भीमरावजी केराम यांनी किनवट व माहूरच्या तहसीलदारांना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News