मुखेड:
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो तांदळाचे वाटप (सोशल डिस्टंस पाळून) सरपंच मोहनाबाई नागोराव कोनापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार शिवाजी कोनापूरे,ग्रामसेवक एम.एम. आंबुरे, मुख्याध्यापक के.जी.उमाटे, कर्मचारी जाकिर शेख यांची उपस्थिती होती.
केंद्र शासनाच्या पुढाकाराने आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेवटच्या घटकांना अन्नधान्य मिळावे, आणि कुणीही उपाशीपोटी राहू नये या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेद्वारे ही मोफत अन्नधान्य योजना राबविण्यात येत आहे. आज उमरदरी गावात प्राधान्य कुटुंब योजनेत १११९ लाभार्थी तर अंत्योदय योजनेचे १५६ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ देण्यास सुरुवात करण्यात आली. स्वस्त धान्य दुकानदार सागरबाई मारोती तोटवाड यांनी सर्व लाभार्थ्यांना माल वाटप करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी मोफत धान्य योजना सुरु केली आहे,सर्व गोरगरीब जनतेंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच मोहनाबाई कोनापूरे यांनी केले आहे.





No comments:
Post a Comment