नागपूर :
कोरोना संकटामुळे राज्यातील असंघटित कामगार व रोजंदारी कामगार यांना शासनातर्फे तात्काळ मदत प्राप्त करून देण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, मराविमं मागासवर्गीय वरिष्ठ अभियंता व अधिकारी संघटना, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी कल्याण निधी मंडळ यांचेतर्फे १० लाखांचा धनादेश बुधवारी (दि. १ एप्रिल २०२० ) राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नागपूर जिल्हाचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे साहेब , स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील, एन. बी. जारोंडे, धर्मेश फुसाटे, वाय. डी. मेश्राम इत्यादी उपस्थित होते. डाॅ. नितीन राऊत यांनी यावेळी स्वतंत्र मजदूर युनियनचे अभिनंदन केले. अशी माहिती नांदेड येथील स्वतंत्र मजदूर युनियनचे क्रियाशील कार्यकर्ते कार्यकारी अभियंता माधव सोनकांबळे यांनी दिली.




No comments:
Post a Comment