किनवट :
कोरोनाच्या प्रकोपाने घरीच राहणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या इस्लापूर सर्कलमधील मजूरांना अन्नधान्य उपलब्ध करून आशिस सेवाभावी संस्थने हातावर पोट असणारांच्या भाकरीची सोय केली आहे.
कोरोना विषाणूमुळे देशभर 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन असल्याने लोकांना रोजंदारीवर जाता येईना. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचा भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या गरजू लोकांना अन्न धान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. इस्लापुर सर्कल मध्ये 40 कुटूंबांना भारिप -बमसं तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके, मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष मारोती शेळके, माजी तालुका सचिव गौतम कांबळे, ज्येष्ठ वार्ताहर नारायण दंतलवाड, सामजिक कार्यकर्ते राजू पद्धमवार, शिवशंकर मुंडे, खन्डू मिराशे, मचिन्द्र गजभारे, बाळू बनसोड, त्रिमूर्तीं गायकवाड, प्रकाश पाटील व राहुल कदम यांचे हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले.




No comments:
Post a Comment