मांगीर होण्याआधी... -मारोती कसाब - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 17, 2020

मांगीर होण्याआधी... -मारोती कसाब

                     चित्र :भगवान पेंटर

काळीज घट्ट कर 
हिंमत सोडू नकोस
अजून थोडी वाट पहा
जातील हे बी दिवस
हे तर काहीच नाही,
खूप सोसावं लागेल
आपलं मरण
आपल्याच डोळ्याने
पहावे लागेल
लढायचंय आपल्याला
रडू आवर , पूस डोळे
अजून थोडं चालावं लागेल      
हळुहळू ते हुक्कापानी बंद करतील
जमली आहे फौज त्यांची सीमेवर
ठाऊकच आहे मला 
ते नक्कीच आपल्याला घेरतील                  आपल्याच माणसांना
आपल्याविरुद्ध चिथावतील
तेल सेंदूर पाजून
पुन्हा मला गढीत गाडतील
आता सखे सावध हो
पांढरीशुभ्र साडी घाल
मांगीर होण्याआधी माझा
चल चिल्यापिल्यांसह
बोधीवृक्षाखाली जाऊ
हल्लेखोर येण्याआधीच
तथागताची वंदना गाऊ

-मारोती कसाब
   

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News