.चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केली मुलाची कटींग ; 'कोरोना' लॉकडाऊनमध्ये घालून दिला आदर्श.. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 17, 2020

.चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केली मुलाची कटींग ; 'कोरोना' लॉकडाऊनमध्ये घालून दिला आदर्श..


नांदेड : जिल्हाधिकारी हे पद म्हणजे भारतीय प्रशासन व्यवस्थेमधलं एक महत्वाचं पद . जिल्ह्याचा सगळा कारभार त्यांच्या इशाऱ्यानं चालचो . सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तर जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे अधिकार केंद्रीत झाले आहेत . अशा परीस्थितीत आपल्या मुलाचे केस वाढले असतील , लॉकडाऊनमुळे नेहमीची केशकर्तनालये बंद असतील तर तुम्ही - आम्ही काय केलं असतं ? आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्याला सांगून शहरातल्या सगळ्यात चांगल्या मेन्स पार्लर मधल्या वाकबगार कारागिराला घरी बोलावून आपल्या मुलाच्या कटींगची हौस सहजपणे भागवता आली असती . मात्र नांदेडचे संवेदनशील जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी असे काहीही केले नाही . केस कापायचा आग्रह मुलाकडून धरला जात असल्याचे पाहून त्यांनी स्वत : चे कौशल्य पणाला लावले अन् मुलाचे त्याच्या मनाप्रमाणे केस कापून दिले . लॉकडाऊनचे नियम न मोडता , मुलाची हौस पुरवण्यासाठी आपल्या अत्यंत व्यस्त वेळातून वेळ काढत डॉ . विपीन यांनी मुलाची हौस भागवली . जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने शासनाचे नियम पाळून घालून दिलेला पायंडा सर्वांसाठीच अनुकरणीय आहे . आपण कुणीतरी वेगळे आहोत , लॉकडाऊन असतानाही आपण फोन केला म्हणून त्याने खास माझ्यासाठी दुकान उघडले , अशा बढाया मारत सरकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी हा एक धडा आहे .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News