किनवट :
कोवीड -19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना रूग्णांना तातडीने जिल्हा रूग्णालयाकडे नेण्यासाठी माहूर येथील ग्रामीण रूग्णालयासाठी स्थानिक विकास निधीतून त्वरीत रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असे पत्र आमदार भीमराव केराम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर वर्तमान स्थितीत भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'कोरोना' विषाणूचा प्रकोप पाहता यात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे दिसत असून यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी बहूल माहूर तालुक्यातील जनतेला यासंबंधातील संसर्ग परिस्थितीत येथील रूग्णालयात पुरेसा वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी माफक आशा सर्वसामान्य बाळगून असताना आपातकालिन परिस्थितीत रूग्णांना जिल्हा रूग्णालयाकडे स्थलांतरीत करण्यासाठी माहूर येथील ग्रामीण रूग्णालयाकडे रूग्णवाहिकेचा अभाव आहे. यासाठी नवीन रूग्णवाहिका खरेदीसाठी स्थानिक विकास निधीअंतर्गत तातडीने निधी मंजूर करून रूग्णवाहिकेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.




No comments:
Post a Comment