भोकर :
पंचायत समितीचे माजी सभापती आणि नांदेड जिल्हा परिषदेतील माजी सदस्य रमेशराव सरोदे यांचे सोमवारी ( ता. १३ ) संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मंगळवारी ( ता. १४ ) सकाळी ११ वाजता मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.




No comments:
Post a Comment