'त्या ' मृत् बिबट्या प्रकरणी न्यायालयाने सुनावली तिघांना एक दिवसाची वनकोठडी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, April 19, 2020

'त्या ' मृत् बिबट्या प्रकरणी न्यायालयाने सुनावली तिघांना एक दिवसाची वनकोठडी


किनवट : झळकवाडीच्या जंगला जवळील शेतात मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने या प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी तिघा संशयिरत आरोपींना ताब्यात घेऊन हजर केले असता न्यायाधीसांनी त्यांना एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.
             शुक्रवारी (दि.17 ) तालुक्यातील वन परिक्षेत्र जलधारा मधील जलधारा परिमंडळातील कुपटी बीटातील कक्ष क्र . 263 च्या राखीव वनक्षेत्राच्या दक्षिणेस अंदाजे 30 मिटर अंतरावर माधव पुंजाजी झळके रा . झळकवाडी  यांच्या शेतामध्ये एक नर बिबट मृत अवस्थेत आढळून आला . घटनास्थळी फिरून पाहणी केली असता जवळच 150 मीटर अंतरावर एका कुत्र्याचे शव आढळून आले आहे. सदर मृत वन्यप्राणी बिबट व मृत कुत्राचे पशुधन विकास अधिकारी , जलधारा यांनी शव विच्छेदन करून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणीकरिता मांसाचे तुकडे सिलबंद केलेले आहेत . 
             सदर घटनेबाबत भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम - 1972 चे कलम - 2 ( 16 ) , 9 , 39 , 51 व भारतीय वन अधिनियम - 1927 चे कलम 66 नुसार प्रथम वनगुन्हा क्र . 1 / 733 / 2020 दि . 17 / 04 / 2020 नोंदविण्यात आलेला आहे . दिनांक . 18 . 04 . 2020 रोजी सदर प्रथम वनगुन्ह्याबाबत तीन संशयित आरोपी नामे - रामजी नामदेव बर्गे वय - 30 वर्ष रा . झळकवाडी ता . किनवट जि . नांदेड , प्रदीप गोवर्धन राठोड वय - 23 वर्ष रा . तल्लारी तांडा ता . किनवट जि . नांदेड व गोवर्धन रूपसिंग राठोड वय - 50 वर्ष रा . तल्लारी तांडा ता . किनवट जि . नांदेड यांना वनगुन्हेकामी चौकशीकरिता ताब्यात घेऊन दि . 19 . 04 . 2020 रोजी मा . न्यायदंडाधिकारी , प्रथम श्रेणी न्यायालय , किनवट यांच्यासमोर हजर केले असता मा . न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना एका दिवसाची वनकोठडी सुनावली आहे . 
             वरील आरोपींची वनगुन्हेकामी संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे . बिबटाचा नेमका कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे याचा तपास घेणे चालू आहे . वन प्रकल्प विभाग , किनवटचे विभागीय व्यवस्थापक एस.एच. वाजे, सहाय्यक व्यवस्थापक जे . डी . प-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जलधराचे वन परिक्षेत्र अधिकारी एम . डी . गिते, वनपाल एन . ए . गावंडे , वनरक्षक एम . के. पेंदे  अधिक तपास करत आहेत . सदर वनगुन्ह्यातील इतर आरोपिंचा शोध सुरु आहे .


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News