विहिरीत पडून दोन तरुणांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 18, 2020

विहिरीत पडून दोन तरुणांचा मृत्यू




किनवट : तालुक्यातील  दहेली तांडा येथील दोन तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ( दि.१८ एप्रील ) दुपारी १२:३० च्या दरम्यान घडली आहे. 
      दहेली तांडा येथील शुभम गणेश पवार वय वर्ष ( २२ ) व नशिर खान नूर खान पठाण वय वर्ष (२०) हे दोघे गावा नजिक असलेल्या उस्मान दिवाणजी यांच्या शेतातील विहिरीत पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने या दोघाही मित्रांचा मृत्यू झाला.  दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. संदीप जाधव व डॉ. दिलीप मंडलवार यांनी शवविच्छेदन करुम शव मृतांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. यावेळी सिंदखेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय चव्हाण व पोलिस हेड कॉन्स्टेबल पठाण, भारत राठोड, दारासिंग चव्हाण यांनी या घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News