... ' त्या ' शिबीरार्थींना देताहेत योगाचे धडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 7, 2020

... ' त्या ' शिबीरार्थींना देताहेत योगाचे धडे



किनवट  :
 येथील मदत शिबीरात ठेवलेल्या ' त्या 33 मजूरांना ' दररोज योग प्रशिक्षण दिले जात आहे ; येथील सोयी, सुविधा,स्नेहाची वागणूक व या वेगळ्या अनुभवाने सारेच आनंदाने विसावले आहेत.
                कोरोना (कोव्हीड-१९ ) प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे पायी जाणाऱ्या तेहतीस मजुरांना ताब्यात घेऊन गोकुंदा ( पूर्व )  येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृहात स्थापित मदत शिबीरात ठेवले आहे. फय्याज फ्रुट कंपनीच्या वतीने त्यांना दोन वेळा जेवन व फ्रुटसुध्दा देण्यात येत आहेत. 
                सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेनुसार योग तज्ज्ञ देविदास मुनेश्वर, वंदना मुनेश्वर व शासकीय आश्रमशाळा,जलधाराचे क्रीडा शिक्षक संदीप यशीमोड हे दररोज सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत गोकुंदा येथील ' शिबीरार्थींना ' योग प्रशिक्षण देत आहेत. आम्हाला हा वेगळा अनुभव मिळाला असून आम्ही गावी गेल्यानंतर नियमीत योगा करणार आहोत. असे शिबीरार्थीनी सांगितले. 
                तहसिलदार नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम नोडल अधिकारी म्हणून शिबीरार्थीची काळजी घेत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी वैद्यकीय पथक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात यांनी पोलिस तैनात केले आहेत. गटविकास अधिकारी सुभाष धनवे व गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने हे घ्यावयाच्या काळजीबद्दल जनजागृती करीत आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News