नांदेड :
माहूर तालुक्यातील मौजे हरडफ येथील अपंग, निराधार,विधवा,वयोवृध्द,भूमिहीन पिडितांनी मागील दोन वर्षापासून अचूक प्रस्ताव दाखल करून माहूर तहसिल प्रशासनाकडे अनेक वेळा खेटे मारूनही माहूरच्या तहसिलस्तरावरिल प्रलंबित प्रकरणांमध्ये दखल घेतली मा.क.प.च्या विनंतीनंतर वतीने अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित अर्जदारांना तात्काळ मदत करण्याची सुचना तहसिलदार सिध्देश्वर वरणगांवकर यांना दिल्याने हरडफ येथील चातका प्रमाणे मदतीची वाट पाहणाऱ्या गोर गरीब अपंग,निराधार व भूमीहिनांना सद्याच्या आपत्तीजन्य परिस्थितीत आधार मिळाला असून त्यांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माहूर तालुक्यातील मौजे हरडफ येथिल मंगलम देवीदास पवार हा एकविस वर्षाचा युवक सद्या इयत्ता बारावीत शिक्षण घेत असला तरिही तो १००% अपंग असून त्याने दि. २८ अॉगस्ट २०१८ रोजी माहूरच्या तहसिल कार्यालयात यांच्याकडे अचूक प्रस्ताव दाखल करून निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केल्यानंतर अनेक वेळा तहसिल कार्यालयात मदतीसाठी विनंती केली माञ तहसिल प्रशासनाने दि.४ एप्रिल २०२० पर्यंत घेतली नाही.तसेच,हरडफ येथीलच अर्जदार निलाबाई वसंतराव बोथिंगे (विधवा),लिलाबाई राठोड (वयोवृध्द) आणि रेणुका ज्ञानेश्वर पिसरवाड (भूमीहीन) यांच्या सह इतर तीस लाभार्थी लोकांनी संजय गांधी, इंदिरा गांधी आदी निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून दि.२७ सप्टेंबर २०१८ रोजी परिपूर्ण प्रस्ताव तहसिलदार माहूर यांच्याकडे सादर केला होता व सातत्याने पाठपुराव्यानंतरही त्यांचे अर्ज मंजूरीऐवजी प्रलंबितच होते.
याबाबतची माहिती मिळताच संबंधित गरजूंना न्याय मिळावा यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माहूर तालुका कमिटीच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी कॉ.शंकर सिडाम व जिल्हा कमिटी सभासद कॉ.प्रल्हाद चव्हाण यांचे मार्फत नांदेड जिल्हा पक्ष कार्यालयास सविस्तर कळविण्यांत आल्यानंतर पक्षाचे नेते कॉ.विजय गाभणे यांनी तात्काळ पक्षाचे जिल्हा कमिटी सभासद तथा नांदेड शहर सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत जिल्हा स्तरावर सदर प्रकरणांत पाठपुरावा करण्यासाठी सुचना देण्यात आल्यानंतर त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याशी संपर्क साधून याबाबतची सविस्तर माहिती देऊन सदर प्रकरणांत स्वतः लक्ष देण्याची विनंती केली.कॉ.गंगाधर गायकवाड यांनी व्हाॅट्सअॅप वरून पाठविलेल्या निवेदनाची विनाविलंब दखल घेऊन सदर प्रकरणांत योग्य ती कारवाई करण्याची सुचना माहूरचे तहसिलदार यांना दिली.तसेच,ठिक आहे, काळजी करू नका असा उत्तराचा संदेशही परत पाठविला.
दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कॉ.गायकवाड यांनी तहसिलदार वरणगांवकर यांना पाठवून प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली होती. परंतू, उशिरापर्यत तहसिलदारांनी सदरचा संदेश बघितला नसल्यामुळे पुनश्च अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांच्या निदर्शनास सदर बाब आणून देण्यात आल्यानंतर मात्र तहसिलदारांनी सकारात्मक संदेश कॉ.गायकवाड यांना पाठवून सदर प्रकरणात तात्काळ लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
सद्या आपत्तीच्या काळात देशी निराधार,अपंग, विधवा,भूमीहीन,वयोवृध्द गरजूंना यामूळे ख-या अर्थाने आधार देत अप्पर जिल्हाधिकारी परदेशी वेळेवर दखल घेऊन योग्य न्याय दिल्याची प्रतिक्रिया देत सदरिल लाभार्थ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करुन मा.क.प.जिल्हा कमिटी त्यांचे आभारी असल्याचे काॅ.गायकवाड म्हणाले.




No comments:
Post a Comment