बँक कर्मचाऱ्यांनी केला टरबूज कापून वाढदिवस साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 22, 2020

बँक कर्मचाऱ्यांनी केला टरबूज कापून वाढदिवस साजरा



गोपाल गौरवाड
ढाणकी ( यवतमाळ ) : संचारबंदी व लॉकडाऊच्या काळात बँक या अत्यावश्यक सेवेत कार्यरत कॅशिअर महेंद्रसिंह बैस यांनी चक्क टरबूज कापून आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
                कोरोनाच्या प्रादुर्भावाने झालेल्या टाळेबंदीत ज्या काही अत्यावश्यक सेवा सुरू आहेत त्यामध्ये बँक सेवेचासुध्दा समावेश आहे. त्यामुळे आम्ही आमची वैयक्तिक कामे बाजूला ठेवून कार्यरत आहोत. ही सेवा जनतेला देतांना आम्हाला खूप समाधान आहे, असे राजलक्ष्मी बँकशाखेचे  शाखाधिकारी अभिजित महामुने यांनी सांगितले.
                जनसेवेला प्राधान्य देत बँकेतील कर्मचारी संदिप शेषराव महाजन, शेख फिरोज, दीपक कवडे यांच्या उपस्थितीत राजलक्ष्मी शाखेचे कॅशियर  महेंद्रसिंह बैस यांनी आपला  वाढदिवस शाखेतच साधेपणाने, शारिरीक अंतर पाळून साजरा करायचे ठरविले. यावेळी केकच्या ऐवजी त्यांनी टरबूज कापून वाढदिवस साजरा केला. तसेच गोपाल गौरवाड यांना डिपॉझिट पावती देऊन डिपॉझिट योजनेचा शुभारंभ केला. याप्रसंगी राजलक्ष्मी च्या कर्मचाऱ्यांनी जनतेला असे आवाहन केले की,घरातच रहा, सुरक्षित रहा.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News