नांदेड : आज ११ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . आतापर्यंत ११६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत ५६ रुग्णांवर औषध उपचार चालू आहे . अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी शुक्रवार ( दिनांक २२/०५/२०२० रोजी ) सायंकाळी ०५.०० वाजता दिली.
.. कोरोना विषाणु संदर्भात सविस्तर माहिती अशी की, आज दिनांक २२/०५/२०२० रोजी यात्री निवास एनआरआय कोबीड सेंटर येथील १० रुग्ण व डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड येथील ०१ रुग्ण असे एकूण ११ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . आतापर्यंत ११६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत ५६ रुग्णांवर औषध उपचार चालू आहे .
आज पर्यंत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १२९४७४ व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकूण २९६१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत . त्यापैकी २५४१ स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकूण आज पाठविण्यात आलेल्या १३४ रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व ४३ रुग्णांचे स्वॅब तपासणी चालू आहे . सदर घेतलेल्या एकूण स्वॅब पैकी ११६ तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आलेले आहेत. काल प्राप्त झालेल्या एकूण ८७ अहवाला पैकी ६ रुग्णांचा अहवाल पाँझीटिव्ह प्राप्त झाला आहे . त्यामध्ये ४ पुरुष ( अनुक्रमें वय वर्षे १४ , १८ , ३३ , ७४ ) व २ स्त्री ( अनुक्रमे वय वर्षे ३४ , ६५ ) यांचा समावेश आहे. त्यामधील एका पुरुष रुग्णाचा वय वर्षे ७४ यांचा मृत्यु झाला आहे . सदरील रुग्णांपैकी २ मुखेड तालुक्यातील , १ बिलोली तालुक्यातील , १ रुग्ण प्रवासी एनआरआय भवन येथे व उर्वरीत २ रुग्ण हे नांदेड शहरातील लोहारगल्ली भागातील आहे .
एकूण ११६ रुग्णांपैकी ६ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे व ५२ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . ५६ रुग्णांपैकी ०८ रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोबीड केअर सेंटर , यात्री निवास कोबीड केअर सेंटर येथे ४२ रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोबीढ केअर सेंटर मध्ये १ , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ३ , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे १ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे १ रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रवृत्ती सद्यःस्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने -आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ ईश्वरराव भोसीकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 22/05/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 2908
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2650
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1276
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 200
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 70
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2580
• आज घेतलेले नमुने - 134
• एकुण नमुने तपासणी- 2961
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 116
• पैकी निगेटीव्ह - 2541
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 177
• नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 110
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 52
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 6
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 129474 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment