जगातील नंबर एक संशोधक शास्त्रज्ञ मायावी जादूगार थॉमस एडिसन -नवनाथ रणखांबे ( साहित्यिक ) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 27, 2020

जगातील नंबर एक संशोधक शास्त्रज्ञ मायावी जादूगार थॉमस एडिसन -नवनाथ रणखांबे ( साहित्यिक )




जगातील नंबर एक संशोधक शास्त्रज्ञ मायावी जादूगार थॉमस एडिसन
-नवनाथ रणखांबे ( साहित्यिक )

बाल दोस्तांनो, रॉकेलचा दिवा व माझं बालपण आणि बालपणीचा अभ्यास एक यादगार क्षण आहे. आम्ही माळावर राहण्यासाठी असल्यामुळे  त्यावेळी आमच्या घरी लाईट न्हवती. मग घरी चिमणीचा दिवा आणि  काचेचा कंदील असे. चिमणी म्हणजे बाजारातून विकत मिळणारा रॉकेलचा दिवा. काही लोकं तर औषधाच्या किंवा दारूच्या  बाटलीचा घरातच सुतळ किंवा कापडाची वात बनवून बाटलीच्या झाकणाला होल पाडून ती वात वर काढतात. बाटलीत आत रॉकेल ओतून बाटलीचे झाकण घट्ट केले आणि वरती सुतळ किंवा कापडाची वात माचीसने पेटवली की  दिवा लागतो. मग एक गंमत होते. अंधार दूर पळून जातो आणि प्रकाश  चोहिकडे पडतो.
दारू रॉकेलचा दिव्याने काळा धूर निघतो आणि काजळी सर्वत्र पसरते. (इंधनाच्या अपुऱ्या ज्वलनामुळे  धूर निर्माण होतो. धूर हा सर्वात मोठा प्रदूषक आहे.  धूर हा हृदय, फुफ्फुसे यांना हानिकारक आहे)  रात्री हा दिवा लावून झोपले आणि सकाळी झोपेतून उठलं की आरश्यापुढे गेल्यावर पाहिले असता ती धुराची काळी काजळी नाकाच्या होला जवळ बसलेली दिसते. रॉकेल जमिनीवर सांडल्यावर  जमीन या सुगंधी वासाने नटते. या दिव्याचं आणि माझं नातं खूप  जवळचं आणि छान होतं !
        मेणबत्तीच्या शांतीदायक, उत्साहदायक, प्रसंन्नदायक आणि वातावरण सुगंधी करणाऱ्या प्रकाशात मला अभ्यास करायला आणि शांत जेवण करायला फार आवडायचं आणि याच मिण मिणत्य प्रकाशाचा  मी दिवना! जेव्हा मेणबत्ती जळायला सुरुवात होते तेव्हा उष्णतेमुळे मेण वितळू लागते मग ते मेण जाते कुठे ? हा प्रश्न सहज निरीक्षण केल्यावर जाणवतो. थोडक्यात मेणबत्ती पेटल्यानंतर मेणाचे वायुरूपात रूपांतर होऊन हा वायू जळू लागतो आणि त्यातून उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो. मेण हे हायड्रो कार्बन असून यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन असतो. जेव्हा मेणबत्ती जळताना हवेतील ऑक्सिजनशी संबंध येऊन कार्बनडाय ऑक्साइड तयार होतो. मेणबत्तीतील हायड्रोजनचा हवेतील ऑक्सिजनशी संबंध येऊन पाण्याची वाफ तयार होते. या दोन्ही प्रक्रियेत मेणबत्ती जळत जळत लहान होत जाते. 
      विजेची लाईट आणि हा घासलेटचा दिवा याचं निरीक्षण मी केल्यावर  जाणवले  की, लाईटचे बटन चालू केले की विजेचा दिवा म्हणजे बल्ब लगेच लागतो आणि मिण मिणता प्रकाश नाही, काळा कुळा धूर नाही आणि रॉकेलचा वास नाही. या विजेच्या दिव्याचा सगळीकडे लख लखाट  पाहिल्यावर आनंद होतो आणि माझ्या मनात प्रश्न यायचा या विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला असेल ? सिनेमा पहिला कोणी बनवला असेल ? आपण फोनोग्राफ वरील गाणी ऐकत थांबतो  आणि गाण्याच्या तालावर रमतो ते फोनोग्राफ कोणी पहिले बनवले असेल ? ग्रॅहम ने लावलेल्या फोन मध्ये कोणी सुधारणा केल्या ?  तार यंत्रातील विविध शोध आणि सुधारणा कोणी केल्या इ. ?  ह्या पडलेला प्रश्नाचे उत्तर थॉमस एडिसन हे उत्तर मिळाले. मग मी मायावी आणि स्वप्नं नगरी मुंबईच्या प्रेमात जसा पडलो तसाच या 'अवलीयाचे'  कारनामे पाहून मी या मायावी जादूगाराच्या  शास्त्रज्ञ व संशोधकाच्या  प्रेमातच पडलो.
        बाल दोस्तांनो मी थॉमस एडिसन या जगातल्या महान नंबर एक शास्त्रज्ञाची व संशोधक आवलीयाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ती आपणास नक्कीच आवडले आणि आपण त्यांच्यापासून प्रेरणा जरुर घ्याल ! बाल दोस्तांनो एडिसनचा जन्म  कोठे झाला असेल ? 
            *जन्म*:-  अमेरिकेतील ओहिओ या संस्थानातील 'मीलन' या गावी एडिसन जन्म ११ फेब्रुवारी १८४७ मध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव थॉमस आल्व्हा एडिसन होते. त्यांच्या आईचे नाव 'नन्सी' होते. थॉमस एडिसनची आई एक आदर्श शिक्षका होती. वडिल  'सॅम्युएल' लाकडाच्या वखारीचा धंदा करणारे होते. लहानपणी त्याला सर्व जन 'टॉम' असे म्हणत असत. व्यापार
उधर निर्वाहासाठी  एडिसनचे वडिल पोर्ट ह्यूरन या गावी स्थायीक झाले. एडिसनला मग तेथे रहावे लागले. लहानमुले खोडकर, शरारती, खटपटी असतात पण लहानपणापासून एडिसन सर्वात जास्त खोडकर , शरारती, खटपटी आणि दिर्घोउद्योगी होता. लहानपणी तो अशक्त होता.  त्यांच्या शरीराच्या मानेने त्याचे डोकं फार मोठं होतं. या मोठ्या डोक्यात काय काय भरलय हे काही माहीत नव्हतं, ते हळूहळू पुढे येऊ लागलं...! लहानपणापासून एडिसनला खूप खूप प्रश्न पडत असे!  प्रश्न विचारून तो सर्वांना हैराण करून सोडी. ज्याला प्रश्न पडतात तो उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतो जिज्ञासा, चिकाटी आणि मेहनत असेल तर तो त्या उत्तराच्या तळाशी जातोच. असा हा एडिसन शाळेत रमत न्हवता. शाळेत ही त्याला खूप प्रश्न पडत असत. तो सतत प्रश्न विचारत असायचा ?  याच्या भल्या डोक्यात काय शिजतय आणि काय काय या मोठया डोक्याच्या मुलाच्या मनात आहे हा एक प्रश्नच होता ? एडिसनच्या मनातील शंका काढण्यास आणि त्याला शिकवण्यास त्याच्या शाळेतील शिक्षण असफल झाले . अतिशय हा मठ्ठ आहे ? असे दूषणे लाऊन तीन महिन्यांनी शाळेतून  एडिसनला  काढून टाकण्यात आले तशी एडिसन जवळ चिठ्ठी देण्यात आली. शाळेच्या चाकोरीत एडिसन रमत नव्हता. मास्तर काय शिकवतात याकडे याचं लक्ष नसायचं. शाळेचं आणि एडिसनचं सूत्र एकत्र जुळले नाही. एडिसन  म्हणून शाळेत रुळला नाही. त्याचा घरीच अभ्यास सुरू झाला .आई हाच एडिसनचा गुरू होता. एडिसनला काय पाहिजे हे हाडाची शिक्षिका असणाऱ्या आईला समजले होते. एडिसनला घडवण्याच्या दृष्टीने तिने पाऊले टाकण्यास सुरुवात केली. त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आणि त्याला शोधण्यास मदत करण्याचा ती प्रयत्न करीत असे. पुस्तक हा खरा गुरू आणि सोबती असतो. पुस्तक ज्ञान लपवत नाही . वाचाल तर वाचाल म्हणून लहानपणापासून एडिसनला त्यांच्या आई वडिलांनी त्याला पुस्तके वाचनाची आवडत निर्माण करून दिली. पुस्तकं आणि एडिसन याचं एकत्र सूत्र जुळून त्यांची पुस्तका बरोबर जीवापाड  मैत्री घट्ट झाली. आई वडिलांकडून विविध शास्त्रज्ञांची चरित्र्ये आणि ऐतिहासिक पुस्तके त्याला वाचण्यास देण्यात आली. एक पुस्तक वाचले की त्याला ठराविक रक्कम देण्यात येऊ लागली. तो भराभर पुस्तके वाचू लागला. वाचलेल्या पुस्तकांचा साठा मोठा मोठा होऊ लागला . रसायन शास्त्रांची पुस्तके आणि विविध पुस्तके त्यांनी वाचून काढली. बुद्धीची भूक वाढू लागली. त्याला विविध प्रश्न पडू लागले आणि पुस्तकातून ही विविध प्रश्नांची उत्तरे तो  मिळऊ लागला. विविध शोध कसे लागले याची माहिती त्याला होऊ लागली. पुस्तक वाचून मिळणाऱ्या पैशातून तो नवनविन पुस्तके विकत  घेऊ लागला आणि वाचलेले काही प्रयोग तो घरी करून पाहू लागला. कमी वयात त्याने घरात प्रयोग शाळा सुरू केली. एडिसन प्रयोगासाठी लागणारे साहित्य खरेदी करू लागला. त्याची ज्ञानाची भूक पहिल्या पेक्षा वाढत चालली होती. तो आपला वेळ कोणताच वाया घालवत नसे. सतत तो काहींना काही  दिर्घ उद्योग करीत असे. 'शाळेतील' चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा तो 'निसर्ग सृष्टीत' रमला. तो ज्ञान मिळवण्यासाठी  शिकत होता. निसर्गामध्ये सूक्ष्म निरीक्षण करण्याचे आणि जीवनाकडे बघण्याचे मोठं कुतूहल आणि उत्साह त्याच्याकडे होते. निसर्गाचे बारकाईनं अभ्यास करीत तो मोठा  होत होता. 
बाल दोस्तांनो, लहानपणी आज अपल्याला जसे प्रश्न पडतात, तसेच एडिसनल पण पडत असे ! मग तो वेगवेगळे प्रयोग करीत असे, हाच त्याचा दिर्घ उद्योग होता. वेगवेगळ्या  वस्तू तो बनवित असे. त्याचे गमतीदार किस्से खूप आहेत, आपण मोजकेच पाहू..!
        एडिसन सहा वर्षाचा असताना एके दिवशी तो घरातील कोंबडीची अंडी उबवत बसला होता. हे आईने पाहिले आणि एडिसनची आई त्याला बोलली, तू येथे काय करतो आहेस   त्यावर एडिसन बोलला,  येथे कोंबडी अंड्यावर बसून अंडी उबवते व त्यातून पिल्ले येतात. मी अंडी उबवून पाहत होतो की पिल्ले बाहेर येतात का ?  काय बच्चे लोक काय आहे की नाही प्रयोगशील गंमत !
            दहा वर्षांचा  असतांना एडिसनने तारयंत्र करण्याचे ठरवले खंबा ऐवजी झाडांचा वापर केला प्रयोगाची सर्व तयारी झाली तारने बाटल्या खिळ्याच्या मदतीने झाडावर बांधल्या आणि मित्राचे घर आणि आपले घर या तारेने जोडले. प्रयोगाला लागणारे  इतर सर्व साहित्य जमवले . पण वीज कुठे आहे ?  ती कशी आणायची हा प्रश्न पडल्यावर त्याला आठवले एक पुस्तकात त्याने वाचले होते. मांजराच्या कातड्यावर काचेचा दांडा घासला तर वीज तयार होते. मग या संशोधक पट्ट्याने, एक जिवंत मांजर पकडून आणून त्यांच्या  अंगावर काचेचा दांडा तो फिरवू लागला. तशी मांजर तेथून पळून गेले आणि बेत फसला ! बाल दोस्त हो, आहे ना मजेशीर प्रयोग!
                क्रमश: भाग १
(©® लेखक नवनाथजी  रणखांबे, संचारबंदी मधील डायरी @ कल्याण)

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News