सगळं काही बकवास..!
-प्रा. नंदू वानखडे
'चक्रीवादळामुळे कोसळतात मोठी मोठी झाडे ...
जमीनदोस्त होतात मोठ्या मोठ्या वस्त्या वाडे ...
छोटासा विषाणू बंदिस्त करतय अवघे जग..
शस्त्र- आगारे पडतात सुनीसुनी..
तळहात' पाहून--
भविष्य सांगणाराचेच आयुष्यच
आता मोठ्या कसोट्या झेलत
झोकांड्या खात चाललंय
जाग्यावर..
रोजीरोटीचा सवाल बिकट बनला
आहे म्हणून...
मुर्खांची संख्या वाढणार की
घटणार ..याचा ताळेबंद सुरू आहे
भविष्यकारांच्या डोक्यात...
भिंतीवरचं कॅलेंडर पंचांग सांगत
होतं आजवर..
मागची 'राशिभविष्य' सांगणारी
पानं..
मागताहेत माफी नुसतीच वटवट
केली आतापर्यंत म्हणून..!
बसलीत चुपचाप भयग्रस्त
होऊन...
मी घेत बसलो धांडोळा माझाच--
'आजवर कोठे होतो आपण..?'
कपाळावरच्या रेषा ,
हातावरच्या हस्तरेषा,
मधल्या बोटाची नाडी....
मूर्खपणाची हद्द ओलांडून राशिभविष्य' वाचून धाक- धुकीत
लोटणारी जगण्याची गाडी..
सगळं काही बकवास...
सगळा अंधविश्वास...
फक्त खरा असतो नासिकातून
वाहणारा गरम उष्ण श्वासोश्वास...!
-प्रा. नंदू वानखडे ,
मुंगळा जि. वाशिम
9423650468
No comments:
Post a Comment