किनवट : स्वातंत्र्याच्या हक्कासाठी उलगुलान छेडणारे, तमाम भारतीयांना गुलामीतून बाहेर येण्यासाठी मुक्ततेचा संदेश देणारे महान नायक शहीद बिरसामुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अशोक स्तंभ चौकातील धरतीका आबा बिरसामुंडा यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
किनवट - माहूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी सर्वप्रथम पुष्पहार अर्पूण अभिवादन केले. त्यानंतर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्माणीवार, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेमानीवार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भरकड, संतोष मरस्कोल्हे, नगरसेवक शिवा आंधळे, व्यंकट नेम्माणीवार, नरेश सीरमनवार, उपसरपंच बालाजी पावडे, कृष्णा पाटील, रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, बालाजी धोत्रे, संतोष चनमनवार, फजल चव्हाण, मधुकर अन्नेलवार, सतीश बिराजदार, नरसिंग तक्कलवार, आकाश भंडारे, राजेंद्र भातनासे, शिवा क्यातमवार व प्रेमदास मेश्राम आदी कार्यकर्त्यांनी पुष्पार्पून अभिवादन केले.





No comments:
Post a Comment