नांदेड : आज मंगळवारी ( दिनांक नऊ जून ) सायंकाळी पाच वाजता कोरोना विषाणू संदर्भात प्राप्त माहितीनुसार मुखेड कोचिड केअर सेंटर येथील २ रुग्ण व पंजाब भवन यात्री निवास नांदेड पेथील १ रुग्ण असे एकूण ३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे ;तर प्राप्त झालेल्या एकूण ३० अहवालापैकी २९ अहवाल निगेटिव्ह व नवीन एका रुग्णाचा स्वॅब पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १९३ एवढी झाली आहे .
आज प्राप्त झालेला १ पॉझीटीव्ह रुग्ण पुरुष वय वर्ष ४१ रा . शाहूनगर , नांदेड या परीसरातील आहे . सद्यस्थितीत त्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे . आतापर्यंत १९३ रुग्णांपैकी १३४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ५० रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण त्यापैकी ०१ स्त्री रुग्ण ज्यांचे वय ६५ आणि २ पुरुष ज्यांचे वय ६५ व ७४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .
दि. ९ जून रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता : सर्वेक्षण १४३७२३,घेतलेले सर्व ब ४५७९,
निगेटिव्ह स्वॅब ४०४३,आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या १, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण १९३, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १७६, स्वॅब नाकारण्यात आलेले संख्या ८१, मृत्यू संख्या ९, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या १३४, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ५०, स्वॅब तपासणी संख्या ७९.
दि. ९ जून रोजी ७९ स्वब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. एकूण १९३ पैकी ९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व १३४ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरित ५० रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ११ रुग्ण , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण ३८ तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर कोविड केअर सेंटर येथे १ रुग्ण उपचारासाठी दाखल असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधपचार सुरु आहेत . तरौ जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नपे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ ईश्वरराव भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 09/06/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4545
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4321
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2388
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 81
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 176
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4145
• आज घेतलेले नमुने - 79
• एकुण नमुने तपासणी- 4579
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 193
• पैकी निगेटीव्ह - 4043
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 79
• नाकारण्यात आलेले नमुने - 81
• अनिर्णित अहवाल – 176
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 134
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 9
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 143723 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment