नांदेड : आज बुधवारी (दिनांक १० मे रोजी ) सायंकाळी ०५.०० वाजता कोरोना विषाणू संदर्भात प्राप्त माहितीनुसार पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील ०३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १३७ एवढी झाली आहे .
आज रोजी प्राप्त झालेल्या एकूण ६० अहवालापैकी ४९ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन १० रुग्णांचा स्वॅव पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ एवढी झाली आहे . आज ०२ पॉझीटीव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे . त्यापैकी ०१ रुग्ण हा पुरुष वय वर्ष ६५ रा . इतवारा नांदेड व १ पुरुष रुग्ण वय वर्ष ४५ रा . वसमत जि . हिंगोली येथील आहे . सदरील दोन्ही रुग्ण डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार घेत होते . रुग्णास उच्च रक्तदाव , श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते .
आज प्राप्त झालेल्या १० पॉझीटीव्ह रुग्णांपैकी ८ पुरुष वय वर्ष अनुक्रमे १२,४३,४५,४७,४८.५४.५५ व ६ महिन्याचे बालक असे आहेत त्यापैकी ५ रुग्ण आहे इतवारा नांदेड या बाधित क्षेत्रातील आहेत , १ रुग्ण मालेगाव रोड आणि २ रुग्ण हे सिडको नांदेड या परीसातील आणि २ स्त्री रुग्ण वय वर्ष अनुक्रमे ५० व १० असून त्यापैकी १ रुग्ण चौफाळा या परीसरातील व १ रुग्ण इतवारा नांदेड येथील आहे . यातील ९ रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे . आतापर्यंत २०३ रुग्णांपैकी १३७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ५५ रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण त्यापैकी ०१ स्त्री रुग्ण ज्यांचे वय ६५ आणि २ पुरुष ज्यांचे वय ३८ व ७४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .
दि .१० / ०६ / २०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता : सर्वेक्षण १४४०१३, घेतलेले स्वॅब ४६५८, निगेटिव्ह स्वॅब ४०९२,आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या १०,एकूण पॉझीटीव्ह रुग्ण२०३, स्वॅब तपासणीअनिर्णीत संख्या १७७ , स्वॅब नाकारण्यात आलेले संख्या ८१, मृत्यू संख्या ११, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या १३७ ,रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ५५, स्वॅब तपासणी रुग्ण संख्या ७९.
दिनांक १०/०६/२०२० रोजी ७९ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील . एकूण २०३ की ११ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १३७ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित ५५ रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १४ रुग्ण , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण ३ ९ तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर कोविड केअर सेंटर येथे १ रुग्ण उपचारासाठी दाखल असून १ रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाला आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 10/06/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4580
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4337
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2445
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 95
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 126
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4211
• आज घेतलेले नमुने - 79
• एकुण नमुने तपासणी- 4658
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 203
• पैकी निगेटीव्ह - 4092
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 98
• नाकारण्यात आलेले नमुने - 81
• अनिर्णित अहवाल – 177
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 137
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 11
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 144013 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment