किनवट ( नांदेड ) : पिंपरी ( तेलंगाणा ) येथील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक कोंडाबाई मल्लाजी भवरे ( वय ८४ वर्षे ) यांचे बुधवारी ( ता. १० जून ) रात्री आठ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, एरीगेशन काॅलनी, गोकुंदा येथे वास्तव्यात असलेले धाकटे चिरंजीव अनिल मल्लाजी भवरे यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांचे पश्चात विवाहीत दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे जन्मगाव मौजे अंबाडी, ता.किनवट येथे गुरुवारी ( ता. ११ जून ) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निवृत्त बँक अधिकारी नंदकुमार हलवले व आनंदराव हलवले यांच्या त्या मोठ्या भगिणी असून ग्रामीण रुग्णालय आर्णी येथील वैद्यकीय अधिक्षक तथा प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनिल भवरे यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment