बालकाच्या हातात लेखणी हवी, फावडा नव्हे ! -यशोधरा सोनेवाने, गोंदिया - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 12, 2020

बालकाच्या हातात लेखणी हवी, फावडा नव्हे ! -यशोधरा सोनेवाने, गोंदिया


बालकाच्या हातात लेखणी हवी, फावडा नव्हे !

-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
 

बालकामगार विरोधी दिनानिमित्त -यशोधरा सोनेवाने, गोंदिया यांचा लेख -संपादक

"बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा"असे आपण नेहमी म्हणतो . कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो . ना कसली चिंता ना कसली काळजी , मनसोक्त खेळा , हसा , आनंद लुटा ,पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो . कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो. तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले , हॉटेल , बसस्थानक , रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी , टेबल साफ करणारी मुले पाहतो . अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते . कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे . हेच ते बालकामगार 12 जून बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं .14 वर्षांखालील जी मुले स्वतःच्या  आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी , रोजगार कमवितात त्यांना *बालकामगार* म्हणतात . ज्या वयात शाळेत जावून शिकायचे , खेळायचे , बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ - सफाई करायची , भांडी , कपडे धुवायचे , विटा उचलायच्या , दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात . एकीकडे बोट ठेवलं ती वस्तू विकत घेऊन देणारी हौशी मॉम - डॅड तर दुसरीकडे कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप . समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार ? हा समाजापुढे गहण प्रश्नच आहे . देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो . बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे . अनेक जिल्ह्यात 2004 पासून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविल्या जात आहेत . या प्रकल्पांतर्गत 9 ते 14 वयोगटातील धोकादायक , व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्या हातात लेखणी देऊन फावडा नव्हे.शैक्षणिक स्तर उंचावणे आजच्या काळाची गरज आहे. पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे , त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे . अनेक जिल्ह्यात सध्या एकूण  विशेष प्रशिक्षण केंद्र विविध वस्त्यांमध्ये कार्यान्वित आहेत . प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनात साधारणतः कर्मचारी काम करीत आहे .   या प्रकल्पांतर्गत बालकामगारांना विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतो . बालकामगारांना अनौपचारिक शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कौशल्य व कलागुणांना वाव मिळावा , यासाठी विविध ट्रेडचे व्यवसायपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते. तसेच प्रकल्पाचे कार्य व बालकामगार प्रथेविषयी जनमानसात जनजागृती करण्यात येते .
      बालकामगारांना प्रकल्पांतर्गत मिळणारा लाभ प्रत्येक बालकामगाराला दरमहा 150 रुपये विद्यावेतन देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी मित्र अभ्यासक्रमाचा विशेष प्रशिक्षण केंद्रात अवलंब करण्यात येतो. शालेय पोषण आहार , पाठ्यपुस्तके आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात , बालकामगारांना त्यांच्या आवडीनुसार तसेच त्यांच्यातील कौशल्यास अनुरूप असे व्यवसाय पूर्ण प्रशिक्षण देण्यात येते , बालकामगारांना विविधांगी उपक्रमातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येते . तसेच जीवन कौशल्य राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पामार्फत बालकामगारांना जीवन कौशल्य विषयाचा प्रभावी संवाद कौशल्य , स्वतःची जाणीव , प्रभावी नेतृत्व , निर्णयक्षमता , ध्येय निश्चिती , भावनिक समायोजन , कल्पकता , निरीक्षण निरोगी जीवन यासारख्या विविध विषयांच्या माध्यमातून भावी आयुष्यात सुजाण नागरिक घडविण्याचे प्रयत्न केले जातात . जिल्हाधिकारी  यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पाचे कामकाज सुयोग्यरित्या सुरू आहेत.
. बालकामगारांना नियमित शाळेत दाखल करण्यात आले आहे . तसेच प्रकल्पामार्फत बालकामगारांना जन्म दाखला , जातीचा दाखला , आधार कार्ड , इ.सोयीने देण्याची व्यवस्था केली जाते. शासनाने 1986 सालापासून बालकामगार विरोधी कायदा बनविला असून या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास भविष्यात बालकामगार ङाहोण्यास आळा बसेल . मुले शिकावी म्हणून अशा अनेक योजना शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत राबविल्या जात आहेत . राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या माध्यमातून बालकामगार होवू नये म्हणून सजगता निर्माण केली जात आहे . त्याला जिल्हास्तरावर भरघोस प्रतिसाद मिळत आहे , हेच या प्रकल्पाचे खरे यश आहे .
            प्रत्येक  बाल कामगार निषेध आणि जनजागृतीसाठी बालकामगार दिन साजरा केला जातो.  २००२ मध्ये, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक बाल कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.  संस्थेच्या अंदाजानुसार जगात 218 दशलक्ष मुले आहेत.  एका अंदाजानुसार, भारतात हा आकडा 1 कोटी 26 लाख 66 हजार 377 पर्यंत पोहोचला आहे.  10 ऑक्टोबर 2006 पर्यंत बालमजुरांना धोकादायक व धोकादायक नसलेल्या बालमजुरीच्या वर्गात कोंडीत ठेवले होते.  या कायद्यानंतर १ 198 66 मध्ये ढाबा, घरे, हॉटेल्स, दंडनीय गुन्हा यासाठी बालकामगार करण्यासाठी सुधारित करण्यात आले.  1979. मध्ये, बालश्रम रद्द करण्याच्या उपाय म्हणून सरकारने गुरुपाद स्वामी समितीची स्थापना केली.  त्यानंतर गुरुपदस्वामी समितीने बालमजुरीसंदर्भातील सर्व समस्यांचा आढावा सादर केला, एक शिफारस देण्यात आली, ज्यामध्ये मजुरीचे मुख्य कारण दारिद्र्य असल्याचे मानले गेले आणि ते धोकादायक भागात बालमजुरीचे पालन करण्यात आले . यासाठी  वाडी वस्तीतील बालकामगार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे .चला तर आज संकल्प करू या बालकामगाराना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी विटा,माटी ,फावळ्या ऐवजी लेखणी, पुस्तके वह्या देऊ या.

-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
(9420516306 )
.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News