नांदेड : नांदेड जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात १० व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या २३४ वर पोहचली आहे. २१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज दिनांक १२/०६/२०२० रोजी पंजाव भवन पात्री निवास नांदेड येथील २१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या १६० एवढी झाली आहे . आज दिनांक १२/०६/२०२० रोजी प्राप्त झालेल्या एकूण ४७ अहवालापैकी ३७ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले व नवीन १० रुग्णाचा स्वॅब पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २३४ एवढी झाली आहे . आज प्राप्त झालेल्या १० पॉझीटीव्ह रुग्णांपैकी ७ पुरुष ज्यांची वय अनुक्रमे २२,२६,३०,३६,४९ ,५५ व ६१ अशी आहेत आणि ०३ स्त्री रुग्ण ज्यांची वय अनुक्रमे २०,५५ व ५ वर्षांची मुलगी अशी आहेत . सर्व रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे . आज ०२ पॉझीटीव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे . त्यापैकी ०१ रुग्ण हा पुरुष वय वर्ष ७४ रा.उमरखेड जि . यवतमाळ आणि १ स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष ५२ रा.चौफाळा , नांदेड येथील आहे . सदरील दोन्ही रुग्ण डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार घेत होते . रुग्णास उच्च रक्तदाब , श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते . त्यामूळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना मुळे बाधित मृत रुग्णांची संख्या १३ एवढी झाली आहे . आतापर्यंत २३४ रुग्णांपैकी १६० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ६१ रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील ५ रुग्ण, त्यापैकी ०२ स्त्री रुग्ण ज्यांचे वय ५०,६५ आणि ३ पुरुष ज्यांचे वय ३८,५२ व ५४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .
दि . १२/०६/२०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता : सर्वेक्षण १४४३६१, घेतलेले स्वॅब ४८०९, निगेटिव्ह स्वॅब ४१९१, आज रोजी पोझीटीव्ह स्वॅब संख्या १०, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण २३४,स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १८१, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ८३, मृत्यू संख्या १३,रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली संख्या १६०, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ६१, स्वॅब तपासणी रुग्ण संख्या ११३.
दिनांक १२/०६/२०२० रोजी ११३ स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील . एकूण २३४ रुग्णांपैकी १३ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १६० रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २७ रुग्ण , पंजाव भवन कोविड केअर सेंटर येथे एकूण ३६ तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर कोविड केअर सेंटर येथे १ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे २ आणि १ रुग्ण हा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून ४ रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते .
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 12/06/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4757
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4425
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2566
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 159
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 159
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4293
• आज घेतलेले नमुने - 98
• एकुण नमुने तपासणी- 4809
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 234
• पैकी निगेटीव्ह - 4191
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 113
• नाकारण्यात आलेले नमुने - 83
• अनिर्णित अहवाल – 181
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 160
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 144361 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment