बालमजूरी हटवूया, बालमजूरी मिटवूया
-भारती दिनेश तिडके, गोंदिया
"मुले आहेत देवा स्वरूप
श्रम करणे नाही अनुरूप"
बाल श्रम च्या प्रती विरोध दर्शविण्यासाठी व जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 12 जूनला बाल श्रम विरोधी दिन साजरा केला जातो. बाल श्रम चा अर्थ असा आहे की ज्यात काम करने वाला व्यक्ति कायद्यानुसार छोट्या वयाचा असतो. साधारणता चौदा वर्षे वयाच्या खालच्या मुलांकडून काम करून घेणे कायद्याने गुन्हा आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटना जागृकता निर्माण करण्यासाठी 2002 मध्ये विश्व बाल श्रम विरोधी दिवसाच्या रूपात सुरुवात झाली. संघटना नुसार विश्वामध्ये 21 करोड 80 लाख बाल श्रमिक आहेत. भारतामध्ये सुद्धा बालमजुरीचे प्रमाण पुष्कळ आहे. हे बाल मजूर ढाब्यावर ,घरी, हॉटेलमध्ये, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी काम करतात. या बाल श्रमिकांना कामावर ठेवणे दंडनीय अपराध आहे.1979 ला सरकारद्वारे मजुरीला नष्ट करण्यासाठी गुरुपाद स्वामी समितीची स्थापना झाली. या समितीमध्ये अशी शिफारस केली गेली की धोक्याचे क्षेत्रात बालमजुरी वर रोक लावली पाहिजे. आणि त्या क्षेत्रातच तर मध्ये कार्यक्षेत्रात सुधार करायला हवा.
"बालमजुरी हटवू या
बालमजुरी मिटवूया."
1986 नुसार बालमजुरी प्रतिबंधक अधिनियम अस्तित्वात आला. 1987 साली बालश्रमिकांसाठी विशेष नीती बनवली गेली. ज्यामध्ये बाल श्रमिकांना कठीण कार्य करायला नको यावर भर देण्यात आला. बालमजुरांची संख्या दिवसेंदिवस भारतात वाढतच आहे. कारखाने, मिठाईच्या दुकानात, याशिवाय अनोपचारीक क्षेत्रात जसे रस्त्यावर वस्तू विकणे. फटाक्याच्या कारखान्यात काम करणे, शेतीची कामे तसेच घरीसुद्धा लपून लपून काम करणे इत्यादी.
जगभरात साधारणपणे 2.5 करोड मुले ज्याची वय दोन -सतरा वर्षाच्या मध्ये आहे. मुलींसाठी वेश्यावृत्ति पण त्यात सामील आहे. यालाच अनुचीत शोषण म्हटले जाते. कारण ही मुले शाळा सोडून कामे करतात. यात गरीब घरची मुले बाल श्रमिक बनतात. म्हणून 14 वर्षापेक्षा कमी मुलांना काम देणे हे कायदे विरोधी आहे. जर या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर शेजारी-पाजारी मुले काम करीत असतील तर पोलिसात तक्रार करायला हवी. कारण ज्या व्यक्तीने बाल कामगाराला कामावर ठेवले त्याला सहा महिने किंवा दोन वर्षापर्यंत सजा होऊ शकते. तसेच 20000-50 हजार रुपये जुर्माना भरावा लागू शकतो. बालमजुरी थांबविण्यासाठी फॅक्टरी कायदा 1948 नुसार 14 वर्षाच्या कमी वयातील मुलांना काम करण्यासाठी निषिद्ध केले आहे. रात्रीसुद्धा त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. 1996 व उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की मुलांचे बाल शोषण रोखून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे जरुरी आहे. कारण मुले देशाचे आधारस्तंभ आहे त्यांच्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
भारतामध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन संघ, भारतीय मजदूर संघ, सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन, हिंद मजदूर सभा, बालश्रम मुलं कल्याण कार्यक्रम अशा काही संघटना बाल श्रम विरोधी कार्य करीत आहे. बालमजूरी संपूर्ण नष्ट करायला हवी. त्यासाठी अनेक कायदे सुद्धा तयार झाले आहेत.भारतामध्ये बीबी शैक्षणिक कल्याण कार्यक्रम सुद्धा तयार झाली आहेत.
-भारती दिनेश तिडके, रामनगर, गोंदिया
8007664039




No comments:
Post a Comment